मुंबई : (Shalarth Scam) राज्यातील अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीत नियमबाह्यरीत्या समाविष्ट करून वेतन अदा केल्याच्या गंभीर प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष चौकशी पथकाला (एसआयटी) राज्य शासनाने आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. तसेच, एसआयटी प्रमुख डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली झाल्यानंतरही अंतिम अहवाल सादर होईपर्यंत त्यांच्याकडेच पथक प्रमुखपदाची जबाबदारी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शुक्रवारी, शालेय शिक्षण विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. यापूर्वी एसआयटीला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी ७ जून २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आता एसआयटीला दि. ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या कालावधीत तपास पूर्ण करून अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Shalarth Scam)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....