धूम ४’च्या चर्चांना पूर्णविराम! ‘रामायण’नंतर रणबीर कपूर ‘या’ मोठ्या चित्रपटात दिसणार; ॲनिमल पार्कवरही मौन..

 
 
 

ranbir
 
मुंबईः(Ranbir Kapoor ) बॉलिवूडचा हँडसम हंक अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित आणि महत्त्वाकांक्षी ‘रामायण’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच त्याने दिग्दर्शक नितेश तिवारी, निर्माता नमित मल्होत्रा आणि सहकलाकार यश यांच्यासोबत अमेरिकेतील प्रतिष्ठित सॅन दिएगो कॉमिक-कॉन मध्ये हजेरी लावून चित्रपटाचा जागतिक स्तरावर प्रचार केला. या आंतरराष्ट्रीय सोहळ्यादरम्यान एका मुलाखतीत रणबीरने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दिली असून, गेल्या अनेक महिन्यांपासून रंगणाऱ्या ‘धूम ४’ च्या चर्चांवर स्वतः पडदा पाडला आहे.या आंतरराष्ट्रीय सोहळ्यादरम्यान एका मुलाखतीत रणबीरने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दिली असून, गेल्या अनेक महिन्यांपासून रंगणाऱ्या ‘धूम ४’ च्या चर्चांवर स्वतः पडदा पाडला आहे.
 
धूम ४’ मध्ये रणबीर कपूर?
 
मुलाखतीदरम्यान सूत्रसंचालकाने यशच्या आगामी ‘टॉक्सिक: अ फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ चित्रपटाचा उल्लेख करत, रणबीर कपूर ‘धूम ४’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले. या अफवेवर रणबीरने तत्काळ स्पष्टीकरण देत म्हटले, "नाही, सध्या मी फक्त 'रामायण' आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'लव्ह अँड वॉर' या दोनच चित्रपटांवर काम करत आहे. 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट जानेवारी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे." रणबीरच्या या एकाच वाक्याने 'धूम ४' मधील त्याच्या एन्ट्रीबाबत सुरू असलेल्या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. (Ranbir Kapoor)
 
सध्या फक्त दोनच भव्य प्रोजेक्ट्सवर लक्ष! 
  
रणबीर सध्या कोणत्याही नवीन चित्रपटाच्या घाईत नसून, तो केवळ दोन भव्य आणि मोठ्या बजेटच्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करत आहे. रामायण नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर प्रभु श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. या भव्य चित्रपटाची पहिली झलक कॉमिक-कॉनमध्ये दाखवण्यात आली असून, लवकरच अधिकृत ट्रेलर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. लव्ह अँड वॉर संजय लीला भन्साळी यांच्या या भव्य चित्रपटात रणबीरसोबत आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट जानेवारी २०२७ मध्ये रिलीज होणार आहे. (Ranbir Kapoor)
 
ॲनिमल पार्क'बाबत रणबीरने बाळगले मौन
 
विशेष म्हणजे, आपल्या आगामी चित्रपटांची यादी सांगताना रणबीरने २०२३ मधील ब्लॉकबस्टर 'ॲनिमल'चा सीक्वल असलेल्या 'ॲनिमल पार्क'  चा कुठेही उल्लेख केला नाही. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र रणबीरने यावर कोणतेही भाष्य न केल्याने 'ॲनिमल पार्क'च्या शूटिंगला अजून काही काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
(Ranbir Kapoor)




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर