पेपरफुटीविरोधात केंद्राचे मोठे पाऊल! नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली हाय-लेव्हल टास्क फोर्स; फोर्समध्ये आणखी कोण कोण असणार?


नवी दिल्ली: (Nandan Nilekani Task Force) दिल्लीसह देशभरात पेपरफुटीच्या घटनांविरोधात विद्यार्थ्यांनी उभारलेल्या प्रचंड आंदोलनानंतर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि सुधारणा सुचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्च-स्तरीय टास्क फोर्सची घोषणा केली आहे. याशिवाय, पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी १० कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेले विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. (Nandan Nilekani Task Force)

कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) ३७ दिवसांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून, आता केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. (Nandan Nilekani Task Force)

हाय-लेव्हल टास्क फोर्समध्ये दिग्गजांचा समावेश

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) परीक्षा पद्धतीत तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा करण्यासाठी विविध क्षेत्रांतील आघाडीच्या तज्ज्ञांची या समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. (Nandan Nilekani Task Force)

नंदन निलेकणी (अध्यक्ष): तंत्रज्ञान तज्ज्ञ व इन्फोसिसचे सह-संस्थापक.

एस. सोमनाथ: इस्रोचे (ISRO) माजी अध्यक्ष.

तपन डेका: इंटेलिजन्स ब्युरोचे (IB) माजी संचालक.

व्ही. कामाकोटी: आयआयटी चेन्नईचे (IIT Madras) अध्यक्ष.

अनिता करवाल: माजी शिक्षण सचिव.

अमृत लाल मीना: लॉजिस्टिक्स तज्ज्ञ.

समितीचे मुख्य कार्य काय असणार?


भारताची राष्ट्रीय परीक्षा प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आणि 'पेपरफुटी मुक्त' करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना आखणे आणि आगामी परीक्षांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या शिफारशी सरकारला सादर करणे. हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे. (Nandan Nilekani Task Force)

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर व्हिडिओ पोस्ट करत स्पष्ट केले की, परीक्षांमधील अनियमितता आणि घोटाळ्यांची जलद सुनावणी करण्यासाठी 'फास्ट ट्रॅक' न्यायालये स्थापन केली जातील. दोषींवर कठोर कारवाईसाठी कडक कायद्याचे विधेयक संसदेत मांडले जाईल. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही हाय-लेव्हल टास्क फोर्स दीर्घकालीन सुधारणांवर काम करेल. (Nandan Nilekani Task Force)


शिक्षण मंत्रालयात फेरबदल?

अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) ३७ दिवसांच्या ऐतिहासिक आंदोलनानंतर शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. रविवारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कर्तव्य भवन येथे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आणि उच्च व शालेय शिक्षण विभागाच्या विविध योजना आढावा बैठकांद्वारे सुरू केल्या. (Nandan Nilekani Task Force)







मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर