नागपूर : (Exam Paper Leak Law) पंतप्रधान मोदी यांनी स्वत: पेपरफुटी प्रकरणात लक्ष घातले असून यानंतरच्या काळात कुणाचीही पेपरफुटी करण्याची हिंमत होणार नाही, असे कायदे सरकार करत आहे, अशी प्रतिक्रिया महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
रोहित पवार यांनी पेपरफुटीप्रकरणी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "पेपरफुटीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टास्क फोर्स स्थापन केला असून देशात कडक कायदा येणार आहे. पेपर फोडणाऱ्या समाजविरोधी घटकांचा बंदोबस्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य अधिक कडक कायदे करत आहे. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या या पद्धतीवर आळा घालणे गरजेचे असून आमचे सरकार यावर लक्ष ठेवून आहे."(Exam Paper Leak Law)
आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणी गुन्हा दाखल
"मेळघाटातील धारणी येथील आदिवासी आश्रमशाळेतील मुलांना विषबाधा झाली असून ६९ मुलांना रुग्णालयात दाखल केले होते. इथल्या अन्नात त्रुटी आढळल्या आहेत. याप्रकरणी धारणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने याची दखल घेतली असून तिथल्या किचन सेंटरच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. याठिकाणी विकेंद्रित स्वयंपाकघर स्थापन करा, अशी आदिवासी पालकांची मागणी आहे. एका मध्यवर्ती स्वयंपाकघरात विषबाधा झाल्यास हजारों विद्यार्थ्यांचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे विकेंद्रित स्वयंपाकघर स्थापन करण्याची मागणी आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके तिथे जाऊन आलेत. मीसुद्धा याप्रकरणाची दखल घेतली असून सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत," असेही त्यांनी सांगितले.(Exam Paper Leak Law)
बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना
रविवारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या तिरंगा विजयी जल्लोषाबद्दल बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना असे ठाकरे बंधूंचे झाले आहे त्यामुळे ते बँड वाजवत आहेत. मुले कुणाला झाली आणि बारसे कुणीतरी करत आहेत. त्यामुळे बारसे कुणाचेही असो, त्यांना लाडू खाऊ द्या," असा टोलाही त्यांनी लगावला. (Exam Paper Leak Law)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....