ईपीएफओ मधून पैसे काढताय, TDS कापला नाही म्हणजे टॅक्स माफ?; जाणून घ्या ईपीएफवरील कराचे महत्त्वाचे नियम!


नवी दिल्ली: (EPF Withdrawal Tax Rules) नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असा एक मोठा समज आहे की, पीएफमधील रक्कम काढताना जर टीडीएस (TDS) कापला गेला नाही, तर ती संपूर्ण रक्कम करमुक्त असते. मात्र, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कर तज्ज्ञांच्या मते, 'टीडीएस न कापणे' आणि 'कर लागू न होणे' या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अंतिम कर किती भरायचा हे प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरतानाच स्पष्ट होते. (EPF Withdrawal Tax Rules)

सलग ५ वर्षांच्या सेवेनंतर EPF रक्कम पूर्णपणे 'टॅक्स फ्री'!

जर एखाद्या कर्मचाऱ्याने सलग ५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ नोकरी (सर्व्हिस) पूर्ण केली असेल, तर ईपीएफमधून काढलेली रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. (EPF Withdrawal Tax Rules)

नोकरी बदलल्यास काय?

सलग ५ वर्षांची सेवा म्हणजे एकाच कंपनीत काम करणे गरजेचे नाही. नोकरी बदलल्यानंतर जुन्या कंपनीतील ईपीएफ रक्कम नवीन कंपनीच्या पीएफ खात्यात ट्रान्सफर केल्यास, मागील सर्व्हिस कालावधी नवीन सेवेत जोडला जातो. त्यामुळे एकूण ५ वर्षे पूर्ण झाल्यास ही रक्कम टॅक्स फ्री ठरते. (EPF Withdrawal Tax Rules)

५ वर्षांआधी पीएफ काढल्यास टॅक्स अन् TDS चे नियम काय?

जर ५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच ईपीएफची रक्कम काढली, तर ती करपात्र ठरते. ५ वर्षांआधी ५०,००० रुपयांपर्यंत पीएफ काढल्यास त्यावर TDS कापला जात नाही. मात्र, ही रक्कम करमुक्त नसून आयटीआर (ITR) भरताना तुमच्या कर स्लॅबनुसार त्यावर कर द्यावा लागू शकतो. ५ वर्षांआधी ५०,००० पेक्षा जास्त रक्कम काढल्यास आणि खात्याला पॅन कार्ड (PAN) लिंक असल्यास १०% टीडीएस (TDS) कापला जातो. पॅन कार्ड अपडेट केलेले नसल्यास जास्त दराने (उच्च दराने) टीडीएस आकारला जातो. (EPF Withdrawal Tax Rules)

'या' विशेष परिस्थितीत ५ वर्षांआधीही मिळणार करसवलत!

काही विशिष्ट आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये ५ वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला नसला तरी काढलेल्या रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही. (EPF Withdrawal Tax Rules)

गंभीर आजारपण: गंभीर आजारपणामुळे नोकरी सोडावी लागल्यास.

कंपनी बंद पडल्यास: व्यवसाय किंवा कंपनी बंद झाल्यामुळे नोकरी गेल्यास.

नियंत्रणाबाहेरील कारणे: कर्मचाऱ्याच्या हातात नसलेल्या अथवा नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे सेवा समाप्त झाल्यास.








मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर