नवी दिल्ली: (E20 Janata Party Campaign) 'नीट' पेपरफुटीप्रकरणी अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनानंतर आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर, आता सोशल मीडियावर 'E20 जनता पार्टी' हे नाव अत्यंत वेगाने व्हायरल होत आहे. हा कोणताही राजकीय पक्ष नसून, देशातील पेट्रोल पंपांवर २० टक्के इथेनॉल मिश्रित (E20) इंधनासोबतच १०० टक्के शुद्ध पेट्रोल (इथेनॉल-मुक्त पेट्रोल) उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सुरू झालेली एक मोठी डिजिटल नागरिक मोहीम आहे. (E20 Janata Party Campaign)
काय आहे 'E20 जनता पार्टी' आणि त्यांच्या प्रमुख मागण्या?
'E20 जनता पार्टी' हे 'एक्स' आणि 'इन्स्टाग्राम'वर सुरू केलेले एक डिजिटल हँडल आहे, जे स्वतःला सामान्य वाहनचालकांचा आवाज म्हणून संबोधते. सरकारला E20 इंधन विकायचे असल्यास त्यांनी ते जरूर विकावे, परंतु ग्राहकांना त्यांच्या वाहनांच्या इंजिनच्या सुरक्षिततेसाठी आणि गरजेनुसार १००% शुद्ध पेट्रोल निवडण्याचा पूर्ण अधिकार असावा. ही मोहीम कोणत्याही अनुदानाची किंवा इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर पूर्ण बंदीची मागणी करत नाही. केवळ पंपावर दोन्ही पर्याय उपलब्ध असावेत, ही त्यांची एकमेव मागणी आहे. (E20 Janata Party Campaign)
सोशल मीडिया हँडलवरील पोस्टनुसार, "आम्ही आमच्या कष्टाच्या पैशाने वाहने विकत घेतली आहेत आणि करही भरला आहे. मध्यमवर्गीय देशात वाहने हे रोजगाराचे साधन असल्याने इंजिनच्या कार्यक्षमतेचा थेट परिणाम खिशावर होतो." (E20 Janata Party Campaign)
कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही!
अफवा आणि अटकळांना पूर्णविराम देत 'E20 जनता पार्टी'ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ही एक स्वतंत्र नागरिक मोहीम आहे. याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी, विचारधारेशी किंवा राजकीय फायद्याशी संबंध नाही. ई२० धोरणाच्या वास्तववादी परिणामांवर निष्पक्ष सार्वजनिक चर्चा घडवून आणणे आणि ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. (E20 Janata Party Campaign)
या डिजिटल मोहिमेला देशभरातून, विशेषतः तरुण आणि वाहनचालकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या काही दिवसांत 'X' वरील फॉलोअर्स १३,००० वरून थेट ४५,००० हून अधिक झाले आहेत. इन्स्टाग्रामवर सर्वात मोठी वाढ दिसून आली असून फॉलोअर्स ८,८०० वरून २,५९,००० च्या पार गेले आहेत. (E20 Janata Party Campaign)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.