छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर' अभियानातून नागरिकांना २९ शासकीय सेवा एकाच छताखाली - अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात

    27-Jul-2026
Customs Department
 
मुंबई : (Customs Department) “मुंबई शहर जिल्ह्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर' अभियान शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असून महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याचा याचा उद्देश आहे.” असे मुंबई शहर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी सांगितले. (Customs Department)
 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या वतीने दि. २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुंबई शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. (Customs Department)
 
त्या अंतर्गत १७८-धारावी विधानसभा मतदारसंघातील भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात व आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात १०९ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी अजित नैराळे,जिल्हा नियोजन अधिकारी संजयकुमार शिंदे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.सूत्रसंचालन पंकज चव्हाण यांनी केले, तर निवासी उपजिल्हाधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी आभार मानले. (Customs Department)
 
यावेळी मुंबई शहराचे अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात म्हणाले की, “जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिले जाणारे विविध महसुली दाखले, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवा, आधार सेवा, दिव्यांग सेवा, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्डविषयक सेवा आदींसह एकूण २९ सेवा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी १९ स्टॉल उभारण्यात आले असून नागरिकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये हे अभियान राबविण्यात येत असून शासनाच्या विविध योजना व सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत 'एकाच छताखाली' पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे.” (Customs Department)
 
 




संबंधित मजकूर