छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देणार - प्रकाश आबिटकर

    27-Jul-2026
Government Schemes Maharashtra
 
मुंबई : (Government Schemes Maharashtra) " छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे महसूलविषयक सेवा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देणारे ठरणार आहे. या निर्णयामुळे जमिनीचे व्यवहार फेरफार नोंदी तसेच इतर महसूल कामांतील अडथळे दूर होऊन महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि जनतेसाठी सुलभ होईल, असे मत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. (Government Schemes Maharashtra)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमीत्त व उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंती निमीत्त मुनिंद्र पॅलेस कलनाकवाडी, ता. भुदरगड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रमास शनिवार दि.२५ रोजी प्रमुख उपस्थित राहून याप्रसंगी ते बोलत होते. (Government Schemes Maharashtra)
 
तसेच या अभियानाचा लाभ प्रत्येक नागरिकाने घ्यावा असे आवाहन करत, विविध योजनांतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण देखील यावेळी आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
 
यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पंचायत समिती सभापती, विक्रमसिंह पाटील, आर. वाय. पाटील, उपसभापती अरुणा देसाई, पंचायत समिती सदस्य मंगल कांबळे, मोहन पाटील, कल्याणराव निकम, प्रवीण सावंत, अलकेश कांदळकर, प्रांताधिकारी हरेश सूळ, तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, अनिता देशमुख, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Government Schemes Maharashtra)
 
 




संबंधित मजकूर