‘आपलं गाव’ संकल्पना तालुकास्तरावर राबवण्याची मागणी करणार-साताऱ्यातील कार्यक्रमात आ. प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन

 

Pravin Darekar Aapla Gaav
 
 
 
सातारा(Pravin Darekar Aapla Gaav): ‘आपलं गाव’ हे करमणुकीचे, पर्यटनाचे ठिकाण नाही. झोकून देऊन काम करणे ज्याला म्हणतात ते या वनलक्ष्मी पर्यटन सेवा केंद्राच्या माध्यमातून नंदकुमार काटकर करत आहेत. हा केवळ उपक्रम नाही तर ही एक चळवळ, अभियान आहे. शहरातून गावाकडे जाऊन ‘आपलं गाव’ नावाची संकल्पना गती घेण्याची गरज आहे. आगामी अधिवेशनात ‘आपलं गाव’ ही संकल्पना राज्य सरकारने तालुकास्तरावर राबवावी, अशी आग्रही मागणी करणार असल्याचे प्रतिपादन भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी सातारा येथील कार्यक्रमात बोलताना केले. (Pravin Darekar Aapla Gaav)
 
स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘जनसेवा सप्ताह’ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचे आज सातारा जिल्ह्यातील श्री वनलक्ष्मी कृषी पर्यटन केंद्र ‘आपलं गाव’ मु. पो. बेलदरे, ता. कराड येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ. दरेकर बोलत होते. (Pravin Darekar Aapla Gaav)
 
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, आषाढीच्या मुहूर्तावर एक आगळावेगळा कार्यक्रम नंदकुमार काटकर यांनी आयोजित करून चांगला संदेश समाजमनात दिला आहे. अजित पवार व देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी राज्याचा कारभार चालवत असताना एका विश्वासाने, मित्रत्वाच्या नात्याने राज्याला पुढे नेण्याचे काम केले. दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घेऊन त्याचा प्रचार, प्रसार करणे व गोमातेपासून निर्माण होणाऱ्या पदार्थापासून वेगवेगळ्या प्रकारची औषधे, वस्तू निर्माण करणे असा कार्यक्रम येथे होतोय हा समाजाला चांगला संदेश असल्याचे आ. दरेकरांनी म्हटले.(Pravin Darekar Aapla Gaav)
 
दरेकर पुढे म्हणाले की, पशुसंवर्धन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. गाईंकडे कुणाचे लक्ष नव्हते. गाय ही किती उपयुक्त पशु आहे हे कुणाला माहीत नव्हते. देवाभाऊंनी गोमातेला राजमातेचा दर्जा दिला. चाऱ्यासाठी पन्नास रुपये प्रति गाई मागे देण्याचे काम केले व गोसेवा आयोग आणून त्याला महत्त्व व प्राधान्य दिले. विकासाची गंगा शहराकडे नव्हे तर गावाकडे नेण्यासाठी मोठी भूमिका मुख्यमंत्र्यांनी हाती घेतली आहे.(Pravin Darekar Aapla Gaav)
 
आ. दरेकर म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये सुमारे साडे तीन मिनिटे त्यांनी गोळे यांच्या आपले गाव संकल्पनेवर चर्चा केली. गृहमंत्री अमित शहा हे त्या ठिकाणी गेले. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात अशी केंद्रे उभी राहिली तर आपल्या देशाला कुणाची गरज भासणार नाही. आत्मनिर्भर कृषी कसे असावे हे आपलं गाव या अभियानातून दिसून येईल, असेही दरेकरांनी स्पष्ट केले.(Pravin Darekar Aapla Gaav)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर