मुंबई: (Musafir Cafe) ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या नव्या वेब सीरिजना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशातच 'मुसाफिर कॅफे वेब सिरीज' ने प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत नेटफ्लिक्सवरील ट्रेंडिंग यादीत पहिले स्थान पटकावले आहे. ‘लॉक अप २’या या रियालिती शोने अनेक लोकप्रिय वेब सीरिजना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले होते. मात्र आता अवघ्या काही तासांत 'मुसाफिर कॅफेने त्याची जागा घेतली आहे. (Musafir Cafe)
दिव्य प्रकाश दुबे यांच्या गाजलेल्या 'मुसाफिर कॅफे' या बेस्टसेलर कादंबरीवर आधारित ही वेब सीरिज आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली ही कादंबरी वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली होती. आता तीच कथा बेव सीरिजच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.(musafirCafe)
या आठ एपिसोड्सच्या सीरिजमध्ये विक्रांत मेस्सी, वेदिका पिंटो आणि महिमा मकवाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २४ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर या सीरिजने अवघ्या एका दिवसात ट्रेंडिंगमध्ये पहिले स्थान मिळवले.(musafir cafe)
दरम्यान, 'मुसाफिर कॅफे वेब सिरीज' ला IMDb वर १० पैकी ७.१ रेटिंग मिळाले आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत नेटफ्लिक्सवर नंबर १ स्थान मिळवल्यामुळे ही सीरिज सध्या सोशल मीडियावर आणि ओटीटी प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.(Musafir cafe)