राज्यातील सरकारी रुग्णालयांना आता ‘स्टार रेटिंग’; गुणवत्तेनुसार होणार सार्वजनिक मानांकनशासन निर्णय जारी

    25-Jul-2026   

Maharashtra Government Hospital Star Rating
 
मुंबई,(Maharashtra Government Hospital Star Rating) :राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सरकारी रुग्णालयांच्या सेवेची गुणवत्ता अधिक पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने ‘स्टार रेटिंग प्रणाली’ लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नव्या प्रणालीअंतर्गत रुग्णालयांचे विविध निकषांवर मूल्यमापन करून त्यांना शून्य ते पाच स्टारपर्यंत सार्वजनिक मानांकन दिले जाणार आहे. शुक्रवारी, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.(Maharashtra Government Hospital Star Rating)
 
रुग्णालयांना समान गुणवत्ता मानदंडाबाबत प्रोत्साहीत करणे, संबंधित रुग्णालयाने प्रदान करावयाच्या दर्जेदार सेवेबाबत स्पष्ट व जाहीरपणे घोषित मानकांद्वारे नागरिकांना माहिती देणे, रूग्णालयांनी संपादित केलेली कामगिरी टिकवून ठेवण्यासाठी नियमित प्रोत्साहन देणे हा निर्णयामागचा उद्देश आहे. सेवेच्या दर्जात सुधारणा घडवून आणणे आणि जनतेचा विश्वास दृढ करणे हे या प्रणालीचे उद्दिष्ट आहे.(Maharashtra Government Hospital Star Rating)
 
स्टार रेटिंगचे निकष कोणते?
स्टार रेटिंगसाठी सेवा उपलब्धता व प्रतिसाद, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, आवश्यक औषधांचा साठा, प्रयोगशाळा तपासण्या, एक्स-रे व ईसीजी सुविधा, ओपीडी व बेड ऑक्युपन्सी, प्रसूती व शस्त्रक्रियांची संख्या, रुग्णालयातील स्वच्छता तसेच रुग्णांचा अभिप्राय अशा दहा निकषांच्या आधारे मूल्यमापन केले जाईल. प्रत्येक निकषासाठी ‘पूर्ण’ किंवा ‘अपूर्ण’ असे मूल्यांकन करून अर्धा किंवा शून्य स्टार दिला जाईल. सर्व दहा निकष पूर्ण करणाऱ्या रुग्णालयाला पाच स्टार मानांकन मिळेल.(Maharashtra Government Hospital Star Rating)
 
ही प्रणाली कुणाला लागू असणार?
ही प्रणाली सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये, संदर्भ सेवा रुग्णालये तसेच राज्य कामगार विमा रुग्णालयांना लागू करण्यात येणार आहे. दरवर्षी जानेवारी आणि ऑगस्ट महिन्यात दोन टप्प्यांत रुग्णालयांचे मूल्यमापन करून स्टार रेटिंग जाहीर केले जाईल. चार किंवा त्यापेक्षा अधिक स्टार मिळविणाऱ्या रुग्णालयांना विशेष गौरव प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.(Maharashtra Government Hospital Star Rating)
 
 
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर