ट्रोलिंग ते बॉक्स ऑफिस क्वीन! वयाच्या १६ व्या वर्षी पदार्पण आणि ट्रोलिंगचा सामना...

karishma kapoor
 
मुंबईः (Karishma Kapoor) बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतात. परंतु ९० च्या दशकात अशी एक अभिनेत्री होती, जिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवताच कौतुकाऐवजी तीव्र टीकेचा सामना केला. सुरुवातीला तिच्या लूक, हेअरस्टाईल आणि ड्रेसिंग सेन्सवरून तिला तुफान ट्रोल करण्यात आले. पण आपल्या कौशल्याने आणि कठोर मेहनतीने तिने टीकाकारांची तोंडे बंद करत बॉलिवूडवर राज्य केले. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ९० च्या दशकातील बॉक्स ऑफिस क्वीन करिश्मा कपूर आहे.

वयाच्या १६ व्या वर्षी पदार्पण आणि ट्रोलिंगचा सामना
 
करिश्माने १९९१ मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी 'प्रेम कैदी' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. कपूर घराण्याची परंपरा मोडून अभिनय क्षेत्रात आलेल्या करिश्माच्या सुरुवातीच्या लूकवर आणि मेकअपवर खूप टीका झाली
मात्र, तिने हार न मानता स्वतःमध्ये मोठे परिवर्तन केले.(Karishma Kapoor)
 
गोविंदासोबतची हिट जोडी आणि 'बॉक्स ऑफिस क्वीन'

करिश्माने स्वतःच्या स्टाइल आणि अभिनयावर काम करून ९० च्या दशकात एकामागून एक सुपरहिट चित्रपट दिले. विशेषतः गोविंदासोबतची तिची जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. 'राजा हिंदुस्तानी', 'कुली नं. १', 'हिरो नं. १', 'बीवी नं. १' आणि 'दिल तो पागल है' यांसारख्या चित्रपटांमुळे ती इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी आणि यशस्वी अभिनेत्री बनली. 'दिल तो पागल है' चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.(Karishma Kapoor)
 
शिक्षण अवघे ५ वी पर्यंत, पण बॉलिवूडवर राज्य!
 
करिश्माला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. अभिनयात करिअर करण्यासाठी तिने अवघ्या पाचवीत असतानाच शाळा सोडली होती. शिक्षण जास्त नसले तरी तिची समज, फॅशन सेन्स आणि अभिनयाच्या जोरावर तिने दीर्घकाळ बॉलिवूडवर स्वतःचे वर्चस्व गाजवले.(Karishma Kapoor)
 
आज करिश्मा कपूरची संपत्ती किती?
 
चित्रपटांपासून दूर असली तरी करिश्मा कपूर आज अब्जोपती आणि स्वतंत्र व्यावसायिक म्हणून ओळखली जाते. एकूण संपत्ती: मीडिया रिपोर्टनुसार, करिश्मा कपूर आज जवळपास १२० कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. कमाईचे साधन: चित्रपट आणि रिॲलिटी शोव्यतिरिक्त ती ब्रँड एंडॉर्समेंट्स (जाहिराती), रिअल इस्टेटमधील गुंतवणूक आणि लहान मुलांच्या ब्रँडमधील (Babyoye) समभागांतून मोठी कमाई करते. लक्झरी लाईफस्टाइल: तिचे मुंबईतील वांद्रे आणि खार येथे आलिशान घर असून तिच्याकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू यांसारख्या महागड्या लक्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे.सुरुवातीच्या काळात टीकेचा धनी ठरलेली ही अभिनेत्री आज तिच्या कठोर मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण बनून स्वाभिमानाने जगते आहे. (Karishma Kapoor)




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर