मुंबई,(Ka Rusali Rakhumai Musical Play): सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ‘का रुसली रखुमाई’ या विशेष संगीतमय नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, २५ जुलै दुपारी ४ वाजता साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे होणार आहे. या संगीतमय नाट्यप्रयोगासाठी प्रवेश विनामूल्य असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.(Ka Rusali Rakhumai Musical Play)
भक्ती, समता, प्रेम, श्रद्धा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वारकरी संप्रदायातील विठ्ठल-रखुमाई यांच्या भक्ती, प्रेम, समर्पण आणि अध्यात्मिक मूल्यांचा प्रभावी कलात्मक आविष्कार या संगीतमय नाट्यप्रयोगातून सादर करण्यात येणार आहे. विठ्ठल-रखुमाई यांच्या नात्यातील भावस्पर्शी प्रसंग, भक्तीचा गूढ अर्थ आणि वारकरी संप्रदायातील समता, प्रेम व श्रद्धेचा संदेश नाट्य, संगीत, अभिनय आणि प्रभावी दृश्यरचनेच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडला जाणार आहे.(Ka Rusali Rakhumai Musical Play)
या विशेष नाट्यप्रयोगाचे लेखन विनोद रत्ना यांचे असून दिग्दर्शन पियुष कुलकर्णी यांचे आहे. संगीत संयोजन साई–पियुष, नेपथ्य ऋतुजा बोथे, प्रकाशयोजना अभिप्राय कामठे यांची आहे. कैवल्य केजकर यांचे गायन, तन्मयी कांबळेकर यांचे निरुपण; तसेच चिन्मय पटवर्धन, शुभांगी जाधव आणि अदिती द्रविड यांच्या अभिनयातून हा नाट्यप्रयोग अधिक प्रभावीपणे साकारला जाणार आहे.(Ka Rusali Rakhumai Musical Play)