देशातील ‘जेन झी’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी - नवनाथ बन

    25-Jul-2026   
Gen Z Supports PM Narendra Modi
 
मुंबई : (Gen Z Supports PM Narendra Modi) पाखंडीपणा करत विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कलम ३७० पुन्हा लागू करण्याची मागणी करत देशविरोधी भूमिका घ्यायची, प्रेमानंद महाराज पाखंडी आहेत म्हणत त्यांना शिव्या द्यायच्या, असे प्रकार जंतर-मंतरवर करण्यात आले. आपला गैरवापर केला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सोनमजी वांगचुक यांनीही आपले उपोषण मागे घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी शुक्रवारी पुन्हा केलेल्या आवाहनाचा व्हिडिओ जगभरातील सर्वाधिक लोकांनी पाहिला. देशाच्या तरुणांचे आयडॉल असलेल्या पंतप्रधानांच्या पाठीशी जेन-झी खंबीरपणे उभी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे मुख्य प्रवक्त नवनाथ बन यांनी केले.
 
शनिवारी, पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, "यानिमित्ताने देशात अराजकता निर्माण करणाऱ्या ‘तुकडे तुकडे गँग’ची पार पोलखोल झाली आहे. संजय राऊतांना प्रत्येक बाबतीत अपयश शोधायचे एवढेच माहिती आहे. पेपर फुटल्यानंतर सगळ्यांना अटक करण्यात आली. मात्र, आताच्या कायद्यात दंड आकारणी आणि अधिक शिक्षेची तरतूद नसल्याने सरकार त्यात सुधारणा करते आहे, त्याला तुमचा आक्षेप का आहे? तुम्हाला त्याचे काय दुःख आहे? कारण तुमचा अजेंडा हा पेपरफुटीला शिक्षा झाली पाहिजे हा नसून भारतात अराजकता पसरवणे आणि देशविरोधी भूमिका घेत हे सरकार पाडण्याचा आहे." (Gen Z Supports PM Narendra Modi)
 
ते पुढे म्हणाले की, "संजय राऊत, तुमचे इन्स्टाग्राम आणि तुमचा पक्ष हॅक झाला आहे. तुम्ही हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि जनतेलाही सोडले. तुमच्या पक्षाचा पासवर्ड आधी हिंदुत्व होता, आता तो पासवर्ड औरंगजेब फॅन क्लब असा झाला आहे. कलम ३७० हटवण्याचे काम अख्ख्या काँग्रेसला जमले नाही ते अमित शाह यांनी एका दिवसात करून दाखवले. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याबद्दल संजय राऊत अतिशय वाईट शब्द वापरतात. महिलांचा सन्मान आणि राऊत यांचा काहीही संबंध नाही. याआधीही त्यांनी स्वप्ना पाटकर यांना केलेली शिवीगाळ महाराष्ट्राने पाहिली आहे. तुम्ही महिलांचा, लाडक्या बहिणींचा कायम अपमान केला असून महिला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत," असेही ते म्हणाले. (Gen Z Supports PM Narendra Modi) 
 
मनसेच्या धमक्यांना घाबरणार नाही
 
नवनाथ बन म्हणाले की, "काही मनसेचे भाडोत्री तट्टू शुक्रवारी माझ्या सोसायटीबाहेर येऊन घोषणाबाजी करून गेले. माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. निजामांविरोधात लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाचा मी नातू आहे. तुम्ही कितीही घोषणाबाजी केली, आरडाओरडा केला तरी मनसैनिकांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. आम्ही निजामांना घाबरलो नाही, त्यांच्या बंदुकीच्या गोळ्यांना घाबरलो नाही. तुमच्यासारख्यांच्या घोषणाबाजीला काय घाबरणार?" (Gen Z Supports PM Narendra Modi)
 
 
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर