मुंबई (Bombay High Court Jagannath Rath Yatra): मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी जय जगन्नाथ चॅरिटेबल ट्रस्ट, मालाड यांना भगवान श्री जगन्नाथ यांच्या रथयात्रेस मूळ नियोजित मार्गाने मिरवणूक काढण्यास परवानगी दिली. न्यायालयाच्या आदेशानंतर सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत "जय जगन्नाथ"च्या जयघोषात रथयात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.(Bombay High Court Jagannath Rath Yatra)
मालवणी पोलीस ठाण्याने दि. २२ जुलै रोजी ट्रस्टला मालवणी गेट क्रमांक ५ येथील हजरत अली मशिदीसमोरील मार्गाने रथयात्रा नेण्यास मनाई केली होती. तसेच यात्रेत अत्यल्प भाविकांचा सहभाग असावा, अशी अट घालण्यात आली होती. या संदर्भात ट्रस्टने डीसीपी, झोन-११ यांच्याकडे लेखी निवेदन देऊन पुनर्विचाराची विनंती केली; मात्र कोणताही लेखी निर्णय न मिळाल्याने ट्रस्टने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.(Bombay High Court Jagannath Rath Yatra)
याचिकेवर सुनावणीदरम्यान अॅड. कौशिक म्हात्रे यांनी ट्रस्टची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या रामस्वामी उदयार विरुद्ध डिस्ट्रिक्ट कलेक्टर या निर्णयाचा दाखला देत सार्वजनिक रस्ता हा सर्व नागरिकांसाठी समान असून, केवळ मार्गावर धार्मिक स्थळ असल्यामुळे धार्मिक मिरवणुकीवर बंदी घालता येत नाही, असा महत्त्वपूर्ण मुद्दा न्यायालयासमोर मांडला.(Bombay High Court Jagannath Rath Yatra)
या युक्तिवादाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनाकडे विचारणा केली. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात रथयात्रेला पूर्वनियोजित मार्गाने जाण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार न्यायालयाने रथयात्रेस परवानगी देणारा आदेश दिला.(Bombay High Court Jagannath Rath Yatra)
न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या रथयात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत रथयात्रा शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडली.(Bombay High Court Jagannath Rath Yatra)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक