मराठीचे तथाकथित कैवारी अमराठीत पोपटपंची करु लागले; मंत्री आशिष शेलार यांची ठाकरेंवर कवितेतून खरमरीत टीका

    25-Jul-2026   




Ashish Shelar on Raj Thackeray
 
 
मुंबई (Ashish Shelar on Raj Thackeray); मराठीचे तथाकथित कैवारी अमराठीत पोपटपंची करु लागले, अशी खरमरीत टीका सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर केली. (Ashish Shelar on Raj Thackeray)
 
देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणी सुरु असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी इंग्रजीत ट्विट केले. तर, शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी हिंदीत भाषण केले. यावर मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर एक कविता पोस्ट करत ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. (Ashish Shelar on Raj Thackeray)
 
ते आपल्या कवितेत म्हणाले की, "शिवतीर्थावरील काकांचे टिवटिव इंग्रजी झाले, मातोश्रीवरच्या युवराजांनी भाषण हिंदीत केले. 'जेन झी'ने यांचे बघा काय हाल केले? मराठीचे तथाकथित कैवारी अमराठीत पोपटपंची करु लागले," अशा शब्दात मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरेंवर टीका केली. (Ashish Shelar on Raj Thackeray)
 
 
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर