राज्य महिला आयोगाच्या संपूर्ण टिमची तातडणी नियुक्ती करावी: विजया रहाटकर

    24-Jul-2026   
 
Vijaya Rahatkar Maharashtra Women Commission
 
पुणे (Vijaya Rahatkar Maharashtra Women Commission) : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नुकतीच माहिती दिली की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांसह संपूर्ण सदस्यांची नियुक्ती तातडीने करण्यात यावी, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यासंदर्भात त्यांना पत्रही दिले आहे. राज्य महिला आयोग सक्षम असेल तरच महिलांच्या तक्रारींचे तातडीने निवारण आणि त्यांना न्याय मिळवून देता येईल. त्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या नियुक्तीसह संपुर्ण सदस्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या.
 
 
नाशिकचे कथित भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी संबंधित वादग्रस्त प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले. या प्रकरणामुळे रूपाली चाकणकर यांनी २० मार्च रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून राज्य आयोगाचे अध्यक्षपद रिक्तच आहे. महिलांसदर्भात योग्य तो न्याय निवाडा करण्यासाठी महिला आयोगाची भूमिका निर्णायक आहे. या पार्श्वभूमीवर विजया रहाटकर म्हणाल्या की राज्य महिला आयोगाची पदे रिक्त असली तरी राष्ट्रीय महिला आयोग महाराष्ट्रातील प्रत्येक तक्रारींवर व केसेसवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना सातत्याने दिल्या जात आहेत. (Vijaya Rahatkar Maharashtra Women Commission)
 
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर