श्रीकांत' चित्रपटासाठी शरद केळकरने घेतले फक्त १ रुपया मानधन; आर्थिक संकटातून बनलेल्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

 
 
Shrikant movie
 
मुंबई : (Shrikant movie) आर्थिक अडचणी, मर्यादित बजेट आणि निर्मितीतील अनेक आव्हानांवर मात करत तयार झालेल्या 'श्रीकांत' या चित्रपटाने ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्म'चा (Best Hindi Feature Film) मान पटकावला आहे. या यशासोबतच चित्रपटाशी संबंधित एक अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी किस्सा समोर आला आहे. या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर यांनी या भूमिकेसाठी अवघे १ रुपया मानधन स्वीकारले होते.
 
दृश्यम, तानाजी आणि बाहुबलीच्या व्हॉईस-ओव्हरमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या शरद केळकरने कथानकावरील निस्सीम विश्वासापोटी हा निर्णय घेतला होता.(Shrikant Movie)
 
आर्थिक संकटातही कलाकारांनी दिला पाठिंबा उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या संघर्षावर आधारित असलेला हा चित्रपट तुषार हीरानंदानी यांनी दिग्दर्शित केला असून निधी परमार हीरानंदानी यांनी त्याची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्काराच्या घोषणेनंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या मेकिंगदरम्यान आलेल्या आर्थिक अडचणींचा खुलासा केला.
 
चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या होत्या. अगदी चित्रीकरण थांबण्याची वेळ आली होती. अशा कठीण प्रसंगी: राजकुमार राव, ज्योतिका आणि अलाया एफ यांनी आपल्या मानधनात खूप मोठी कपात केली.
 
शरद केळकर यांनी केवळ १ रुपया मानधन घेऊन चित्रपटाला पूर्ण पाठिंबा दिला कलाकारांनी स्वतःच्या मेकअप आणि वैयक्तिक खर्चातही कपात करून निर्मात्यांना सहकार्य केले. निर्माती निधी परमार यांच्या मते, निर्माता भूषण कुमार आणि संपूर्ण टीमच्या या निसिम सहकार्यामुळेच 'श्रीकांत'चा पडद्यावरील प्रवास पूर्ण होऊ शकला.(Shrikant Movie)
 
 
बॉक्स ऑफिसवरही केली उत्तम कमाई
  • जवळपास ३५ ते ४७ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळवली.
  • भारत कलेक्शन: ₹५६ ते ५९ कोटी
  • वर्ल्डवाईड कलेक्शन: ₹६० ते ६३ कोटी
  • कमी बजेट आणि बिकट परिस्थितीत तयार झालेल्या 'श्रीकांत'ने व्यावसायिक यशासोबतच राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवून टीमच्या प्रामाणिक मेहनतीची पावती मिळवली आहे.(Shrikant movie)




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर