राजकीय फायद्यासाठी रोहित पवारांकडून पोलिसांच्या बदनामीचा प्रयत्न – नवनाथ बन

    24-Jul-2026
     
 

Navnath Ban on Rohit Pawar             
 
 मुंबई,(Navnath Ban on Rohit Pawar): “रोहित पवार यांनी राजकीय फायद्यासाठी सोशल मीडियावरील एका व्हिडिओचा विपर्यास करून मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. वस्तुस्थिती अशी दिसते की, संबंधित पोलीस अधिकारी कोणत्याही महिलेशी गैरवर्तन करतांना दिसत नाहीत. ते निळ्या शर्टमधील व्यक्तीला पकडण्यासाठी धावत गेले होते. हे व्हिडिओच्या सुरूवातीपासून स्पष्ट दिसत आहे.” अशी प्रतिक्रीया भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवार दि.२४ रोजी आपल्या एक्स हँडलवरून दिली आहे.,(Navnath Ban on Rohit Pawar)
 
“रोहितदादा, तुमच्या राजकीय फायद्यासाठी आणि स्वार्थी राजकारणासाठी मुंबई पोलीसांना बदनाम करू नका. फक्त सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा तथ्यांची पडताळणी करूनच सार्वजनिक आरोप करायला हवेत. तुमचं हे राजकारण बघून जनतेच्या डोक्यात तिडीक येते हे लक्षात ठेवा.मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचं राजकारण थांबवा आणि व्हिडिओ पुन्हा एकदा नीट डोळे उघडून बघा.”असेही बन म्हणाले आहेत.,(Navnath Ban on Rohit Pawar)
 
 




संबंधित मजकूर