मुंबई (Chandrashekhar Bawankule on Student Protest) : विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलनाची वेळ येणार नाही, असा तोडगा केंद्र सरकार काढेल, असा विश्वास महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, " मी सर्व आंदोलकांशी फोनवर बोललो असून आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, असे त्यांनी मला सांगितले. विद्यार्थांना पुन्हा मनस्ताप होऊ, पेपरफुटीसारख्या प्रकरणांमुळे त्यांचे खच्चीकरण होऊ नये, ही बाब केंद्र सरकारने गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे लवकरच केंद्र सरकार यावर उत्तम मार्ग काढले. यापुढे विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची गरज पडणार नाही, असा काहीतरी तोडगा सरकार काढेल."
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 24, 2026
विद्यार्थ्यांचे आंदोलन लोकशाही मार्गानेच
ते पुढे म्हणाले की, "विद्यार्थ्यांचे आंदोलन हे लोकशाही मार्गाने असून त्यावर मी कधीच टीका केली नाही. राहुल गांधी आणि राजकारण्यांनी या आंदोलनात केलेल्या नौटंकीवर मी बोललो होतो. विरोधक या आंदोलनावर राजकीय पोळी भाजत आहेत. राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या घरासमोर जे केले ती एकप्रकारची नौटंकी होती. लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. परंतू, यामागे राजकीय लोक करत असलेली नौटंकी योग्य नाही." (Chandrashekhar Bawankule on Student Protest)
मामलतदार नियमात सुधारणा
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "शेतकरी, शेतरस्ते आणि वहिवाटीच्या रस्त्यांवरचे अतिक्रमण काढून ते तातडीने खुले करणे, वर्षानुवर्षाने सुरु असलेले खटले निकाली काढणे आणि तातडीने राज्यातील शेतकऱ्यांना शेतरस्ते मिळावे यासाठी मामलतदार नियमात आम्ही सुधारणा केली आहे. यासाठी थेट ईमेल वर नोटीस देऊन किमान तीन महिन्यांच्या आत हे खटले निकाली काढण्यात येईल. शेतरस्त्याचा खटला तीन महिन्यांच्या वर चालू नये, असा प्रयत्न सरकार करत आहे. यासोबतच शेतरस्ता किंवा पाण्याचा प्रवाह अडवणे, महसुली नाल्यांवर अतिक्रमण करणे या सर्व बाबींवर आळा घालण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात तातडीने पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुढच्या पाच वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना शेतरस्ते मिळावे, ही यामागची भावना आहे." (Chandrashekhar Bawankule on Student Protest)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....