विनोद तावडेंनी केला प्रियांका गांधी यांच्या आंदोलनाचा फोलपणा सिध्द,तर श्रेयवादावरून आप काँग्रेसमध्ये जुंपली

    23-Jul-2026
 
 
Vinod Tawde NEET Protest
 
मुंबई,(Vinod Tawde NEET Protest ) नीट परीक्षेवरुन कॉंग्रेसने मंगळवार दि.२१ रोजी दिल्लीत धरणे आंदोलन केले ज्यात खासदार राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधीदेखील सहभागी होत्या.प्रियांका गांधी आणि कॉंग्रेसच्या भूमिकेतील दुटप्पीपणा व फोलपणा भाजप खासदार विनोद तावडे यांनी समोर आणला आहे. आपल्या एक्स हँडलवरुन प्रियांका गांधी यांचा २०२४ सालचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करत बुधवार दि.२२ रोजी विनोद तावडे म्हणतात,"राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार काळात पेपर फूटी रोखण्यात आपल्याच सरकारला अपयश आल्याचे प्रियांका गांधी सांगत आहेत. पण आता सत्ता गेल्यानंतर तीच कॉंग्रेस उत्तरदायीत्वावर बोलत आहे." (Vinod Tawde NEET Protest)
 
आपचे खासदार संजय सिंह यांनी देखील ट्वीट करत कॉंग्रेसला आरसा दाखवला असून आपल्या २१ जुलै रोजीच्या पोस्टमध्ये ते लिहीतात, "देशातील करोडो युवकांसाठी सोनम वांगचुक मागील २३ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत.जंतर मंतरवर देशातील युवा आंदोलन करत आहेत.२० जुलैला युवकांना मारहाण करण्यात आली.क़ॉंग्रेस एक महिन्यापासुन आंदोलनास शिव्या देत आहे.आता राहुल गांधी म्हणत आहेत की जंतर मंतर वर न्हवे आमच्या धरणे आंदोलनात सामील व्हा. युवांच्या आंदोलनास काँग्रेस कमजोर का करत आहे ?
जंतर मंतर वरील आंदोलनात सामील व्हा असे आवाहन काँग्रेस का करत नाही आहे ?" (Vinod Tawde NEET Protest)
 
तर जंतरमंतरवर आत्तापर्यंत खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, यांसह प्रमुख विरोधी पक्षांनी अभिजीत दीपक यांची भेट घेतली पण राहुल गांधी यांनी मात्र आपल्या आंदोलनाचा सवतासुभा कायम ठेवला. काँग्रेसचा कुठलाही प्रमुख नेता जंतर-मंतरवर पाहायला मिळाला नाही. इंडी आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेला काँग्रेस या आंदोलनात मात्र स्वतःचा वेगळेपणा दाखवून राजकीय स्वार्थ साधत आहे. उद्धव ठाकरेंनी सुद्धा जंतर-मंतर वरून आपला राजकीय एजंट राबवताना सरकार उलथवणची भाषा केली. तर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यापूर्वी अभिजीत दीपके याची भेट घेतली. एकूणच विरोधक आंदोलनात सुद्धा स्वतःचा वेगळेपणा दाखवत आहेत. (Vinod Tawde NEET Protest)
 
 




संबंधित मजकूर