कौशल्य विकास व रोजगारनिर्मितीचा संकल्प अधिक दृढ : मंगल प्रभात लोढा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कौशल्य विकास विभागाचा निश्चय

Chief Minister Youth Work Training Scheme
 
मुंबई : (Chief Minister Youth Work Training Scheme) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळत असून, राज्यातील युवकांना त्या संधींसाठी सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास विभाग सातत्याने कार्यरत असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विभागाने रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि उद्योजकतेचा संकल्प अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला.
 
लोढा म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योग आणि गुंतवणुकीला प्राधान्य दिल्यामुळे महाराष्ट्राने देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. दावोस येथे झालेल्या ₹१५.७० लाख कोटींच्या सामंजस्य करारांमुळे राज्यात सुमारे १५.९५ लाख रोजगारनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून, या संधींसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर विभागाचा भर आहे. (Chief Minister Youth Work Training Scheme)
 
एप्रिल २०२४ ते जून २०२६ या कालावधीत राज्यभर १,६१९ रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. या मेळाव्यांमधून ८५ हजार ८३४ युवकांना रोजगार मिळाला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत १ लाख ३८ हजार ६३५ युवकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले असून त्यासाठी ₹८९७.६५ कोटींचे विद्यावेतन वितरित करण्यात आले आहे.
 
सध्या राज्यातील २,५०७ कौशल्य प्रशिक्षण केंद्रांमध्ये ३.८४ लाखांहून अधिक युवक प्रशिक्षण घेत आहेत. राष्ट्रीय अप्रेंटिसशिप योजनांद्वारे १.७१ लाखांहून अधिक उमेदवार रोजगारक्षम झाले आहेत. याशिवाय राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (आयटीआय) दरवर्षी सुमारे १.५ लाख कुशल युवक उद्योग क्षेत्रासाठी तयार होत असल्याचे लोढा यांनी सांगितले. (Chief Minister Youth Work Training Scheme)
 
चालू आर्थिक वर्षात कौशल्य विकास केंद्रे, अप्रेंटिसशिप, शॉर्ट टर्म कोर्सेस आणि आयटीआयच्या माध्यमातून सुमारे ७.५ लाख उमेदवार रोजगारक्षम झाले आहेत. तसेच राज्यातील ३६ स्टार्टअप केंद्रे, मुख्यमंत्री महाफंड आणि विविध स्वयंरोजगार योजनांच्या माध्यमातून नवउद्योजकांना प्रोत्साहन दिले जात असून, रोजगार शोधणाऱ्यांबरोबरच रोजगार निर्माण करणारे युवक घडविण्यावरही विभागाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Chief Minister Youth Work Training Scheme)
 
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांना अधिक कौशल्यसंपन्न, रोजगारक्षम आणि उद्योजक बनविण्याचा विभागाचा संकल्प अधिक दृढ होत असल्याचे सांगत, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाची नवी शिखरे गाठेल, असा विश्वासही मंत्री लोढा यांनी व्यक्त केला. (Chief Minister Youth Work Training Scheme)
 
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर