मुंबई,(Lokmanya Bal Gangadhar Tilak 170th Birth Anniversary): लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १७० व्या जयंती निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवार दि. २३ रोजी लोकभवन, मुंबई येथे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे त्याचबरोबर लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.(Lokmanya Bal Gangadhar Tilak 170th Birth Anniversary)
मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामन्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, कक्ष अधिकारी निलेश हरड, संदेश उतेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कक्ष अधिकारी विजय शिंदे, अमोल चव्हाण यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.,(Lokmanya Bal Gangadhar Tilak 170th Birth Anniversary)