वाढदिवशी मुख्यमंत्र्यांची माऊली चरणी प्रार्थना, 'चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे'; विक्रमी वारीसह स्वच्छतेच्या व्यवस्थेचेही कौतुक

वाढदिवशी मुख्यमंत्र्यांची माऊली चरणी प्रार्थना, "चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे"; विक्रमी वारीसह स्वच्छतेच्या व्यवस्थेचेही कौतुक

    23-Jul-2026
Devendra Fadnavis Ashadhi Wari
 
मुंबई,(Devendra Fadnavis Ashadhi Wari) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आषाढी वारीत सहभागी होत जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. "जन्मदिनी वारीत सहभागी होऊन माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत भाग्याचा योग आहे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.(Devendra Fadnavis Ashadhi Wari)
 
वारकरी हे माऊलीचे जिवंत स्वरूप असल्याचे सांगत, त्यांच्या सानिध्यात राहण्याचे भाग्य लाभल्याचा आनंदही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. "माऊलीकडे काही मागावे लागत नाही. आपल्या मनातील भावना त्यांना माहीत असतात. मात्र प्रत्येक वेळी मी एकच प्रार्थना करतो. चांगला पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी होऊ दे," असे त्यांनी सांगितले.(Devendra Fadnavis Ashadhi Wari) 
 
यंदाच्या आषाढी वारीत ३० ते ३५ लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासनाने दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वारकऱ्यांच्या संख्येचा अंदाज घेतला जात असून, यंदाची वारी उपस्थितीच्या दृष्टीने विक्रमी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Devendra Fadnavis Ashadhi Wari)
 
वारीतील स्वच्छता व्यवस्थेचे विशेष कौतुक करताना फडणवीस म्हणाले, "पूर्वी वाळवंटासारख्या वाटणाऱ्या परिसरात आज वारकरी निर्धास्तपणे जेवण करत आहेत, इतकी स्वच्छता राखण्यात आली आहे." जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांत वारीच्या व्यवस्थापनात मोठे बदल झाल्याचे त्यांनी नमूद केले. जर्मन हँगर, स्वच्छता, पाद्यसेवा आणि अन्य सुविधांमुळे वारीचे स्वरूप अधिक सुबक आणि सुसज्ज झाल्याचेही त्यांनी सांगितले.(Devendra Fadnavis Ashadhi Wari)
 
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि विरोधकांच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे सरकारचे कर्तव्य असून, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सकारात्मक आहे. काही उणिवा राहिल्या असतील तर त्या दूर केल्या जातील. मात्र विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशाची बदनामी होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.(Devendra Fadnavis Ashadhi Wari)
 
 
 




संबंधित मजकूर