विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय करण्याचा प्रयत्न-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; आंदोलनात घुसलेले राजकारण चिंतेची बाब

    23-Jul-2026   
Chandrashekhar Bawankule
 
अमरावती : (Chandrashekhar Bawankule) विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे राजकारण सुरु झाले असून आंदोलनाच्या मागे राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न सुरु आहे, हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
 
गुरुवारी, अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. या आंदोलनाला राजकीय वळण यायला नको होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच विद्यार्थ्यांकरिता आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या देशात युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने कडक पावले उचलली आहेत. विद्यार्थी आणि युवक सरकारची भूमिका समजून घेतील आणि राजकीय आंदोलन होणार नाहीत, याची दखल घेतील. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ना नाही. परंतू, या ठिकाणी घुसलेले राजकारण ही चिंतेची बाब आहे."(Chandrashekhar Bawankule)
 
ते पुढे म्हणाले की, "रवी राणा यांनी २५ हजार झाडांचे वाटप केले आहेत. नवनीत राणा यांनी 'एक पेड माँ के नाम' असा संकल्प केला असून तो पूर्ण करण्यासाठी आजपासून सुरुवात केली आहे. अमरावतीतील गावागावांमध्ये भविष्यात ५ लाख झाडे लावण्याचा प्रयत्न त्या करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जयंती सोहळा साजरा करण्याचा प्रयत्न आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज भव्य महाराजस्व कार्यक्रम सुरु झाला असून अमरावतीकरांच्या जीवनात नवे परिवर्तन होणार आहे."(Chandrashekhar Bawankule)
 
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना ३५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. येत्या ३० जुलैपर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या सर्व याद्या जाहीर होतील. तसेच सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदानही देण्यात येईल," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.(Chandrashekhar Bawankule)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर