नवी दिल्ली: (Sonam Wangchuk Hunger Strike Condition) नीट पेपरफुटीप्रकरणी आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहारांविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) आंदोलनाला पाठिंबा देताना अनिश्चितकालीन उपोषण करणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आता आपले उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या सफदरजंग रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या वांगचुक यांनी केंद्र सरकारला विशेष पत्र लिहून "युवा आंदोलकांवर कोणतीही दंडात्मक किंवा बदल्याच्या भावनेने कारवाई केली जाणार नाही, याचे स्पष्ट अन् बिनशर्त आश्वासन सरकारने द्यावे," अशी मुख्य अट ठेवली आहे. हे आश्वासन मिळाल्यास आपण लगेचच उपोषण सोडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Sonam Wangchuk Hunger Strike Condition)
सोनम वांगचुक यांनी पत्राद्वारे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात येऊन केलेली विचारपूस आणि उपोषण सोडण्यासाठी केलेल्या विनंतीबद्दल मनापासून आभार मानले आहेत. केंद्र सरकारने सीजेपी आणि आंदोलकांच्या काही प्रमुख मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे वांगचुक यांनी नमूद केले आहे. (Sonam Wangchuk Hunger Strike Condition)
सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यासह केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी घेत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. (Sonam Wangchuk Hunger Strike Condition)
रुग्णालयातून लिहिलेल्या या पत्रात सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारसमोर पुढील महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत:
२० जून रोजी झालेल्या आंदोलनात पोलिसांनी बळाचा वापर केल्यानंतरही विद्यार्थ्यांनी संयम बाळगून शांततेत आंदोलन केले. निष्पक्ष शिक्षण व्यवस्थेची मागणी करणे हा तरुणांचा गुन्हा नाही. त्यामुळे या आंदोलकांवर कोणतीही दंडात्मक, कायदेशीर किंवा बदल्याच्या भावनेने कारवाई करून त्यांचा लोकशाहीवरील विश्वास कमकुवत केला जाऊ नये. (Sonam Wangchuk Hunger Strike Condition)
नीट पेपरफुटी आणि परीक्षेच्या गोंधळामुळे नैराश्यातून जीवन संपवलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने योग्य ती आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी. (Sonam Wangchuk Hunger Strike Condition)
या संपूर्ण प्रकरणाचे उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी चालू संसदेत सविस्तर चर्चा झाली पाहिजे, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करावा. (Sonam Wangchuk Hunger Strike Condition)
AN APPEAL TO THE GOVERNMENT regarding breaking my fast… Once the assurance from govt come I will also appeal to the peacefully protesting students to halt the movement for now and enter into dialogue with the government pic.twitter.com/gR6S8woF5R
पत्राच्या शेवटी सोनम वांगचुक यांनी अत्यंत भावूक अन् ठाम संदेश दिला आहे. "जर सरकारने युवा आंदोलकांवर कोणतीही कारवाई न करण्याचे बिनशर्त आश्वासन दिले, तर सरकारने केवळ माझेच नाही तर भारतातील लाखो तरुणांच्या आकांक्षा आणि भावना ऐकल्या आहेत, या विश्वासासह मी माझे उपोषण मागे घेईन." (Sonam Wangchuk Hunger Strike Condition)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.