"आंदोलनात जाण्यापेक्षा घरी अभ्यास केला!"; नीट फेरपरीक्षेत ऑल इंडिया रँक २ मिळवणाऱ्या पांशुल बन्सलचे वक्तव्य

Panshul Bansal NEET AIR 2 
नवी दिल्ली: (Panshul Bansal NEET AIR 2) नीट पेपरफुटीच्या वादावरून देशभर 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन सुरू असतानाच, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) १६ जुलै रोजी जाहीर केलेल्या फेरपरीक्षेच्या निकालात हरियाणाच्या पांशुल बन्सलने ९९.९९९९ पर्सेंटाइल आणि ७१५ गुणांसह 'ऑल इंडिया रँक २' पटकावत अभूतपूर्व यश मिळवले आहे. देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांपासून दूर राहत, संयम राखून केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यानेच हे यश मिळाल्याचे पांशुलने स्पष्ट केले आहे. (Panshul Bansal NEET AIR 2)
 
"मी निदर्शनांना का जाऊ?" - पांशुल बन्सलचा संयमी दृष्टिकोन
 
३ मे रोजी झालेली मूळ परीक्षा रद्द झाल्यामुळे सुरुवातीला निराशा झाली होती, मात्र या परिस्थितीला त्याने संधीत बदलले. माध्यमांशी बोलताना पांशुल म्हणाला, "परीक्षेनंतर सुरू झालेल्या आंदोलनांमुळे निराशा झाली होती. पण मी विचार केला की, मी रस्त्यावर निदर्शनांना कशाला जाऊ? त्याऐवजी घरी राहून अभ्यास करून गुण आणि कौशल्य सुधारणे अधिक योग्य ठरेल." हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना, पांशुलने या राजकीय व सामाजिक वातावरणापासून स्वतःला दूर ठेवले. (Panshul Bansal NEET AIR 2)
 
हरियाणाच्या पांशुल बन्सलने पंजाबच्या आर्यन गुप्तासोबत संयुक्तपणे ७२० पैकी ७१५ गुण मिळवले होते. समान गुण मिळाल्यामुळे एनटीएच्या (NTA) टाय-ब्रेकिंग निकषांनुसार आर्यन गुप्ताला रँक १ तर पांशुलला 'ऑल इंडिया रँक २' घोषित करण्यात आले. (Panshul Bansal NEET AIR 2)
 
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी स्वतः पांशुल बन्सलची भेट घेतली आणि त्याचे अभिनंदन केले. 'मेटा' वर पोस्ट करत शिक्षणमंत्री म्हणाले, "पांशुलचे यश हे भारतातील तरुण पिढीची जिद्द आणि चिकाटी दर्शवते. भविष्यात तो देशाच्या आरोग्य व्यवस्थेत मोलाचे योगदान देईल." (Panshul Bansal NEET AIR 2)
 
३ मे रोजी झालेली परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे रद्द झाली होती; त्यानंतर २१ जून रोजी फेरपरीक्षा पार पडली. ५५१ भारतीय शहरे आणि १४ आंतरराष्ट्रीय ठिकाणांवरील ५,४४० केंद्रांवरून सुमारे २० लाख उमेदवार सहभागी झाले होते. वैद्यकीय, दंतवैद्यकीय आणि आयुष अभ्यासक्रमांसाठी ११.२१ लाख उमेदवार पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांमध्ये महिलांचे प्रमाण ५८ टक्क्यांहून अधिक आहे. परीक्षा दिलेल्या महिलांपैकी ५६.८% उत्तीर्ण झाल्या, तर पुरुषांचे प्रमाण ५५.१% होते. १३८ उमेदवारांनी ६९० पेक्षा जास्त गुण मिळवले असून, यातील तब्बल ९३ टक्के उमेदवार हे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले आहेत. (Panshul Bansal NEET AIR 2)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर