महेश ट्युटोरियलचा थांबला गाडा ,खाजगी क्लासेसचा धडा

    22-Jul-2026

 
Mahesh Tutorials

 

 मुंबई : (Mahesh Tutorials) इयत्ता १०वी,१२ वी, जेईई , नीट यासारख्या परीक्षा उत्तम मार्क्सनी पास होण्याचा मार्ग दाखवणारे खाजगी क्लासेस सर्वत्र पसरले आहेत.यातीलच एक नाव म्हणजे महेश ट्युटोरियल. पण या क्लासचे अचानक बंद होणे म्हणजे विद्यार्थ्यांना एक मोठा धक्का मानला जात आहे.१९८८ पासून सुरू असलेल्या महेश ट्युटोरियल या खाजगी क्लासच्या जवळपास ३३ शाखा बंद करण्यात आल्या आहेत. कोचिंग चे आगाऊ पैसे भरलेल्या विद्यार्थी आणि पालकांची त्यामुळे मोठी अडचणच झाली आहे. (Mahesh Tutorials)
 
त्यांचे भवितव्य काय यावर कुठेच चर्चा दिसत नाही अगदी आंदोलनात देखील. २०२४ साली दिल्लीत स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या मोठ्या खाजगी क्लास इमारतीत मध्ये पुराचे पाणी साठून तीन विद्यार्थी मृत्युमुखी पडले होते.खाजगी क्लासेस ना दिलेले अवास्तव महत्व पाहता नेमकी शाळा कॉलेज ला दांडी मारणारे विद्यार्थी खाजगी क्लासेस मध्ये मात्र उपस्थित असतात. सध्या नीट परीक्षेच्या पेपर फुटी वरून रणकंदन माजले असताना ,खाजगी क्लासेसची मक्तेदारी आणि दिवाळखोरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्राध्यापक मोटेगावकर क्लासेस व अन्य खाजगी क्लासेस मधील प्राध्यापक यांनी पेपर फुटीत कशा पद्धतीने यंत्रणा राबवली हे आता बाहेर येत असतानाच सी. जे. पी.च्या आंदोलनात मात्र हा मुद्दा पूर्णतः गायब झालेला दिसत आहे. (Mahesh Tutorials)

सरकारने पुन्हा नीटची परीक्षा घेतली त्यात जवळपास २२ लाख विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली आणि जवळपास ११ लाख विद्यार्थी उत्तीर्ण देखील झाले.पण या आकडेवारीवरून लक्षात येते की नीट, जेईई आणि इतर परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांना खाजगी शिकवणी देणाऱ्या संस्था यांचे किती मोठं क्षेत्र आहे. याचा पुरेपूर फायदा खाजगी क्लासचालकांनी उकळलेला दिसतो. खाजगी क्लासेसच्या इमारती आणि तिथे विद्यार्थ्यांनी भरलेली फी आणि सरकारी शाळा , कॉलेज यांच्यामधील तफावत पहायची असेल तर एखाद्या शहरातील खाजगी क्लासेसला भेट दिल्यानंतर सहज समजते. खूप मोठी आर्थिक उलाढाल यामध्ये असते हे मोटेगावकर प्रकरणात सर्वांना परिचित झाले आहे. (Mahesh Tutorials)

 
 




संबंधित मजकूर