१० वर्षे सेवा पूर्ण न होता नोकरी सोडली तर पेन्शनच्या रकमेचे काय होते? जाणून घ्या ईपीएस नियम अन् ईपीएफओच्या EPFO 3.0 आगामी युनिव्हर्सल पेन्शन योजनेची माहिती!

 
EPFO Pension Rules
 
नवी दिल्ली: (EPFO Pension Rules) नोकरी बदलताना किंवा सोडताना कर्मचाऱ्यांच्या मनात भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि कर्मचारी पेन्शन योजनेच्या (EPS) रकमेबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. विशेषतः १० वर्षांची सेवा पूर्ण होण्याआधी नोकरी सोडल्यास पेन्शनच्या पैशांचे काय करावे, याविषयी स्पष्टता असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळी कर्मचाऱ्यांकडे रक्कम काढण्याचा किंवा 'स्कीम सर्टिफिकेट' घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो. दुसरीकडे, ईपीएफओ आता 'EPFO 3.0' अंतर्गत संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह गिग वर्कर्स आणि फ्रीलान्सर्ससाठी 'युनिव्हर्सल पेन्शन योजना' आणण्याच्या तयारीत आहे. (EPFO Pension Rules)
 
१० वर्षांपेक्षा कमी सेवा असल्यास 'ईपीएस' रकमेचे काय करावे?
 
१० वर्षांची सेवा पूर्ण न करता नोकरी सोडल्यास कर्मचारी नियमानुसार नियमित पेन्शनसाठी पात्र ठरत नाहीत. अशा वेळी कर्मचाऱ्यांकडे दोन मुख्य पर्याय असतात: (EPFO Pension Rules)
 
पर्याय १: 'फॉर्म १०-सी' भरून एकरकमी रक्कम काढणे
 
जर तुम्हाला या योजनेतून पूर्णपणे बाहेर पडायचे असेल, तर तुम्ही 'फॉर्म १०-सी' (Form 10-C) वापरून पेन्शन फंडात जमा झालेली रक्कम एकरकमी काढू शकता. मात्र, ही रक्कम काढल्यास तुमचे ईपीएस सदस्यत्व आणि भविष्यातील पेन्शनचा अधिकार पूर्णपणे संपुष्टात येतो. (EPFO Pension Rules)
 
पर्याय २: 'स्कीम सर्टिफिकेट' मिळवणे (सर्वोत्तम पर्याय)
 
भविष्यकाळात पुन्हा नोकरी सुरू करायची असल्यास रक्कम न काढता 'स्कीम सर्टिफिकेट' घेणे अधिक फायदेशीर ठरते. हे प्रमाणपत्र तुमच्या सेवा कालावधीचा रेकॉर्ड ठेवते. नवीन नोकरीत रुजू झाल्यावर हा जुना कालावधी नवीन सेवेत जोडला जातो, ज्यामुळे १० वर्षांची सेवा पूर्ण करून सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. (EPFO Pension Rules)
 
नोकरी सोडल्यानंतर ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार राहिल्यास ईपीएसची रक्कम काढण्याचा अधिकार मिळतो; परंतु निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेसाठी ती पुढील नोकरीशी जोडणे अधिक श्रेयस्कर मानले जाते. (EPFO Pension Rules)
 
'EPFO 3.0': आता सर्वांसाठी 'युनिव्हर्सल पेन्शन योजना'!
 
सध्या पेन्शनची सुविधा मुख्यत्वे सरकारी कर्मचाऱ्यांनाच खात्रीशीरपणे मिळते. मात्र, केंद्र सरकार आणि EPFO देशाच्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थेत ऐतिहासिक बदल करण्याच्या तयारीत आहे: (EPFO Pension Rules)
 
गिग वर्कर्स अन् फ्रीलान्सर्सना लाभ: 'EPFO 3.0' अंतर्गत खाजगी कर्मचारी, गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स, फ्रीलान्सर्स आणि लहान व्यवसायिकांनाही पेन्शनच्या कक्षेत आणले जाईल. (EPFO Pension Rules)
 
कंट्रीब्युटरी पेन्शन मॉडेल: या योजनेत सदस्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागेल, ज्यावर आकर्षक वार्षिक व्याज मिळेल. ६० वर्षांच्या वयात ही रक्कम 'टार्गेट रिटायरमेंट सम' (TRS) मध्ये रूपांतरित करता येईल. (EPFO Pension Rules)
 
डिजिटल डॅशबोर्ड: निवृत्तीच्या वेळी किती फंड हवा आहे, त्यानुसार मासिक किंवा वार्षिक बचत ठरवता येईल आणि त्याचा सर्व हिशोब डिजिटल डॅशबोर्डवर उपलब्ध असेल. (EPFO Pension Rules)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर