सीजेपी आंदोलन आणि राहुल गांधींच्या आंदोलनावर पहिल्यांदाच बोलले धर्मेंद्र प्रधान! - वाचा सविस्तर

 
 
Dharmendra Pradhan CJP Protest
 
नवी दिल्ली (Dharmendra Pradhan CJP Protest) : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर विद्यार्थ्यांचा राजकीय साधन म्हणून वापर केल्याचा आरोप केला. नीट प्रकरणावर संसदेत सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असतानाही काँग्रेसने आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला.
 
सोमवार, २० जुलै रोजी संसद भवन परिसरात झालेल्या संघर्षानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी 'एक्स'वर पोस्ट करत काँग्रेसवर तीव्र शब्दात टीका केली. ते म्हणाले, "काँग्रेसचा उद्देश विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे नव्हता, तर राजकीय फायदा मिळवण्यासाठी गोंधळ निर्माण करणे हा होता." (Dharmendra Pradhan CJP Protest)
 
 
 
प्रधान यांनी सांगितले की, सरकारने नीट प्रकरणातील सर्व मुद्द्यांवर संसदेत सखोल चर्चा करण्याची तयारी यापूर्वीच दर्शवली होती. विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्याबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेत असतानाही विरोधकांनी आंदोलनाचा मार्ग निवडून संसदीय चर्चेऐवजी राजकीय संघर्षाला प्राधान्य दिले, असा आरोप त्यांनी केला. (Dharmendra Pradhan CJP Protest)
 
मंगळवार, २१ जुलै रोजी राहुल गांधी, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर परवानगीशिवाय आंदोलन केल्याचा आरोप करण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधान निवास परिसर हा अतिसंवेदनशील असल्याने दिल्ली पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखले आणि आंदोलन स्थगित केले. (Dharmendra Pradhan CJP Protest)
 
पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय हा चुकीचा असून अशा प्रकारची परंपरा लोकशाही आणि सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे मतही धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले. (Dharmendra Pradhan CJP Protest)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर