नवी दिल्ली (CJP Protest Hearing) : देशात सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलाने याचिका दाखल करत, दिल्ली पोलिसांच्या कारवाईसंदर्भातील व्हिडिओ न्यायालयाने पाहावेत, अशी मागणी केली. त्यावर सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी टिप्पणी करत म्हटले, "न्यायालयाकडे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही. न्यायालयाचा आणि स्वतःचाही वेळ वाया घालवू नका." त्यानंतर न्यायालयाने तातडीच्या सुनावणीची मागणी फेटाळून लावली.
नीट पेपरफुटीविरोधात गेल्या महिनाभरापासून जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे. सोमवार, २० जुलै रोजी आंदोलकांनी संसद भवनाकडे मोर्चा काढला. आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच अश्रुधुराचाही वापर केला. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. (CJP Protest Hearing)
या प्रकरणी एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी मारहाण केल्याचे अनेक व्हिडिओ समोर आल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला. न्यायालयाने हे सर्व व्हिडिओ पाहून या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
मात्र, युक्तिवादादरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्यांना थांबवत म्हटले, "व्हिडिओ पाहण्यात न्यायालयाला रस नाही. आमच्याकडे तितका वेळही नाही. न्यायालयाचा आणि स्वतःचाही वेळ वाया घालवू नका." (CJP Protest Hearing)
१५ मे रोजी एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका बेरोजगार तरुणांचा उल्लेख "कॉकरोच" असा केल्याची चर्चा झाली होती. या विधानानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) या आंदोलनाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते.
ज्या सरन्यायाधीशांच्या टीपण्णीनंतर अभिजीत दिपकेंच्या कॉक्रोज जनता पार्टीचा (सीजेपी) उगम झाला, त्या सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी बऱ्याच दिवसांनी या आंदोलनावर आपली भूमिका पुन्हा मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयात दिल्ली आंदोलानात झालेल्या लाठीचाराबद्दल याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, ही सुनावणी तातडीने घ्यावी, अशी मागणी आंदोलक याचिकाकर्त्यांनी केली आहे. याला सरन्यायाधीशांनी उत्तर दिले आहे. ही याचिका बुधवार, दि. २२ जुलै रोजी त्रिसदस्यीय खंडपीठापुढे ठेवण्यात आली. यावेळी सरन्यायाधीशांनी टीपण्णी केली आहे.
ते म्हणाले, “आमच्याकडे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही. आम्हाला ते व्हिडिओ पाहण्यातही कुठला रस नाही.” जेव्हा विद्यार्थ्यांच्या वकिलांनी मारहाणीचा मुद्दा काढला तेव्हा आमचा वेळ वाया घालवू नका”, असेही ते म्हणाले. १५ मे रोजी एका सुनावणी दरम्यान सरन्यायधीशांनी एका खटल्याच्या सुनावणीवेळी एक वक्तव्य केले होते. ज्यात त्यांनी “देशातील काही बेरोजगार युवक हे झुरळांसारखे आहेत. ते व्यवस्थेवर माध्यमे, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून हल्ले करत असतात.”, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा आधार घेत अभिजीत दिपकेने कॉक्रोज जनता पार्टी नावाचे सोशल मीडिया अकाऊंट तयार केले होते.
२० जुलै रोजी संसदेवर सीजेपीचा मोर्चा निघाला होता. ज्यात हजारो प्रदर्शनकारी संसदेकडे निघाले होते. त्यांना रोखण्यासाठी पोलीसांनी लाठीचार केला. ज्यात शंभरहून पोलीस अधिकारी आणि विद्यार्थी जखमी झाले.
न्यायालयात नेमकं काय घडलं?
याचिकाकर्त्यांचे वकील – विद्यार्थ्यांच्या बाजूने महत्वाचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. नॅशनल टेस्टींग एजन्सीमध्ये सुधारणा घडावी या मुद्द्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी त्यांना थांबवत “धन्यवाद”, म्हटले.
याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी तातडीने सुनावणीची मागणी केली. विद्यार्थी अद्यापही जखमी अवस्थेत आहेत. उपचार घेत आहेत. या प्रकरणाची सुनावणी दि. २३ जुलै रोजी करावी, अशी मागणी केली.
सरन्यायाधीश म्हणाले, आम्हाला कुठेलही व्हिडिओ पाहण्यास अडचण नाही. आमच्याकडे सध्या वेळ नाही. मंगळवार, दि. २१ जुलै रोजी असेच एक प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले होते. त्यावेळीही तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला.
आता पुन्हा त्याच आंदोलनाशी संबंधित सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलेल्या टिप्पणीमुळे या विषयावर नव्याने चर्चा सुरू झाली असून, या विधानाचा परिणाम आंदोलनावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (CJP Protest Hearing)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.