मुंबई : (Protest At Tilak Bhavan) दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनाचे पडसाद बुधवार, दि.२२ जुलै रोजी मुंबईत उमटले. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी प्रभादेवी येथील काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा काढत राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत आंदोलकांना टिळक भवनात प्रवेश करण्यापासून रोखले आणि अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
"राहुल गांधी मुर्दाबाद", "काँग्रेस पार्टी हाय हाय", "भारत माता की जय" आणि "देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. टिळक भवनाच्या चारही बाजूंनी बॅरिकेडिंग करून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनानंतर माध्यमांशी बोलताना अमित साटम यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.(Protest At Tilak Bhavan)
ते म्हणाले, "काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी देशात अराजकता पसरवण्याचा विडा उचलला आहे. स्वतःचे संपलेले राजकारण पुन्हा जिवंत करण्यासाठी देशात आग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस, राहुल गांधी आणि महाविकास आघाडीच्या या नकारात्मक व घाणेरड्या राजकारणाचा आम्ही निषेध करतो," असे ते म्हणाले.(Protest At Tilak Bhavan)
राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "राहुल गांधी यांनी आपला पासपोर्ट सार्वजनिक करावा. कोणत्या वर्षी कोणत्या देशात गेले आणि कोणकोणत्या व्यक्तींची भेट घेतली, याचा संपूर्ण तपशील देशासमोर ठेवावा," असे खुले आव्हान त्यांनी दिले.(Protest At Tilak Bhavan)
भारताच्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख करत साटम म्हणाले, "भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना भारतविरोधी शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी कट रचत आहेत. काँग्रेस, राहुल गांधी, प्रियंका गांधी, महाविकास आघाडी आणि काही विरोधी पक्ष या शक्तींशी हातमिळवणी करत आहेत," असा आरोप त्यांनी केला.(Protest At Tilak Bhavan)
राहुल गांधी यांच्यावर टीका करताना साटम यांनी परदेशात भारत, भारतीय सेना आणि निवडणूक आयोगाविरोधात वक्तव्य केल्याचा आरोप केला. "भारताच्या बाहेर जाऊन देशाविरोधात बोलणाऱ्या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही," असेही त्यांनी म्हटले.(Protest At Tilak Bhavan)
दरम्यान, मंगळवारी दिल्लीत विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी दोन्ही नेत्यांना ताब्यात घेतले होते. या घटनेच्या निषेधार्थ भाजपने देशभरात काँग्रेसविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली असून, त्याचाच भाग म्हणून मुंबईतील हे आंदोलन पार पडले.(Protest At Tilak Bhavan)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.