सुसंगतिनेच साध्य होणार नशामुक्ती; ठाण्यात मुंबई तरुण भारतच्या नशामुक्ती उपक्रमाला तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद..

    21-Jul-2026
Mumbai Tarun Bharat De Addiction Campaign
 
ठाणे : (Mumbai Tarun Bharat De Addiction Campaign) चांगली संगतच तरुणांना अंमली पदार्थांच्या धोक्यापासून लांब ठेवेल म्हणूनच आजच्या कार्यक्रमाची जी थीम आहे सुसंगती सदा घडो.. असेच प्रत्येक तरुणाने आपली संगत चांगली ठेवा आणि या अमली पदार्थांच्या धोक्यापासून कायम दूर राहा असा सल्ला ठाणे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.. पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की देशात अंमली पदार्थांविरोधात झिरो टोलरन्स सुरू आहेत,शासन आणि प्रशासन च्या पातळीवर प्रत्येक घटक याविरोधात लढत आहेत..मात्र जो पर्यन्त सामान्य माणूस या लढ्यात साथ देत नाही तो पर्यत यश येणार नाही..आजचा कार्यक्रम त्याच उद्देशाने आहे जेणेकरून सामान्य जनता या लढ्यात सहभागी होईल..खास करून तरुणाईला मी सांगतो की आपण कोणाच्या संगतीत वावरतो त्याकडे लक्ष द्या...चांगल्या संगतीत असल्यावर तुम्हाला हा धोका टाळता येईल..
 
दैनिक मुंबई तरुण भारत ,महा एमटीबी,ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत ठाणे शहर परिमंडळ -3 यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त 'सुसंगती सदा घडो ' या मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..या कार्यक्रमात पाटील बोलत होते.(Mumbai Tarun Bharat De Addiction Campaign)
 
ठाण्यातील एन के टी कॉलेज सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं..स्कॉन इन्फ्रा प्रेस्ट्रेस एल एल पी आणि मेअर विटाबायोटिक्स हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक होते.
 
यावेळी व्यापीठावर ठाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 बाळासाहेब पाटील,एन के टी कॉलेजचे अध्यक्ष नानजीभाई खिमजी भाई ठक्कर ठाणावाला, मेअर विटाबायोटिक्स चे एच आर मॅनेजर संजय ठाकूर,नशामुक्ती अभियानाचे मिलिंद पाटील, ईगल ब्रिगेडचे संस्थापक विश्वनाथ ,दैनिक मुंबई तरुण भारत चे रिजनल सेल्स हेड अधिक खानोलकर उपस्थित होते.. कार्यकर्मासाठी मोठ्या प्रमाणात महाविद्यालइन तरुण तरुणी उपस्थित होते.
 

Mumbai Tarun Bharat De Addiction Campaign 
 
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजवलंन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली..प्रथम दैनिक मुंबई तरुण भारतचे कल्याण डोंबिवली रिजनल हेड यशवंत मोर्ये यांनी प्रास्ताविक सादर केलं..यावेळी त्यांनी सदर कार्यक्रमाबाबत मुंबई तरुण भारत ची भूमिका विशद केली..
 
त्यानंतर मान्यवरांच स्वागत करण्यात आलं..
 
या नंतर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात ही नशामुक्ती अभियानाचे ठाणे जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत तयार करण्यात आलेल्या विशेष एव्ही चे प्रसारण करण्यात आलं..
यानंतर रावी एंटरटेंमेंट प्रस्तुत ,सुरेश पवार लिखित अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी एक लघु नाटिका सादर करण्यात आली..या नाटिकेला उपस्थित तरुण वर्गाने चांगली दाद दिली.
 
या नंतर ईगल ब्रिगेडचे संस्थपक विश्वनाथन बिवलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना व्यसनमुक्तीचे महत्व पटवून दिले..(Mumbai Tarun Bharat De Addiction Campaign)
 
मराठी सेलिब्रिटिंचीही हजेरी
 
या कर्यक्रमचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटीनी लावलेली हजेरी..सिने दिग्दर्शक विजू माने,अभिनेता संतोष जुवेकर, अभिनेता अभिजित चव्हाण,अभिनेता कुशल बद्रिके यांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवित तरुणांना नशामुक्तीचा संदेश दिला.
 
यावेळी बोलताना दिग्दर्शक विजू माने यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला..(Mumbai Tarun Bharat De Addiction Campaign)
 
 
Mumbai Tarun Bharat De Addiction Campaign
 
"आज आम्ही आमच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येथे आलो आहोत. पण त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाचा संदेशही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात यशस्वी होण्याची क्षमता असते. मात्र, ड्रग्ससारख्या व्यसनांमुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसते. म्हणूनच, कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्धार करा.खरी "ट्रिक" म्हणजे व्यसनात अडकणे नाही, तर त्यापासून स्वतःला वाचवणे. योग्य मित्रांची निवड करा, चांगल्या सवयी लावा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा."
 
-दिग्दर्शक विजू माने
 
तरुणांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ
 

Mumbai Tarun Bharat De Addiction Campaign 
 
"नशा ही अत्यंत वाईट असते तिच्यापासून लांब राहायला हवं..एखादी गोष्ट आपल्याला मिळत नसेल तर जो पर्यंत आपल्याला तो पदार्थ मिळत नाही तो पर्यंत आपलं मन शांत होत नाही,चिडचिड होते याचा अर्थ त्यापासून नशा लागलेली आहे आणी हीच नशा खूप वाईट आणि जीवन उध्वस्त करणारी असते हे लक्षात ठेवा"-मिलिंद पाटील,नशाबंदी मंडळ जिल्हा संघटक..
आपल्या भाषणा दरम्यान पाटील यांनी उपस्थित तरुण वर्गाला नशामुक्तीची शपथ दिली..सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या सह सर्वांनीच हा समाज नशामुक्त करण्याची शपथ घेतली..(Mumbai Tarun Bharat De Addiction Campaign)
 
नानजीभाई ठक्कर यांनी केले मुंबई तरुण भारत च्या उपक्रमाचे कौतुक
 
"चांगला विद्यार्थी घडवायचा असेल तर कोणतेही वाईट व्यसन नको..जर तरुणांना आपल्या आयुष्यात काही बनून मोठं व्हायचं असेल तर आधी वाईट व्यसन टाळा..माझं वय 85 वर्षे आहे आयुष्य एकही वाईट व्यसन मला नाही..आयुष्य सुखी करायचं असेल तर एकच व्यसन हवं ते म्हणजे वाचनाचे..विद्यार्थ्यांनी तर आपल्या आयुष्यात शिक्षण शिवाय दुसरीकडे कुठे लक्षच द्यायला नको....तरुणांना व्यसन पासून मुक्ती साठी जागृती करण्याची गरज आहे मुंबई तरुण भारत नेमके हेच जागृती करण्याचे अत्यंत चांगले काम करत आहे..वर्तमान पत्र तर काढायचे आहेच तो पण तो नुसता व्यवसाय न ठेवता त्याला समाज जागृतीची जोड देऊन मुंबई तरुण भारत ने चांगले उदाहरण घालून दिले आहे त्याबद्दल मुंबई तरुण भारत चे आभार.."
--नानजीभाई खिमजी भाई ठक्कर ठाणावाला,अध्यक्ष एन के टी महाविद्यालय..
 
या नंतर उपस्थित मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.. (Mumbai Tarun Bharat De Addiction Campaign)




संबंधित मजकूर