मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू

    21-Jul-2026   
Mumbai Police Section 144
 
मुंबई : (Mumbai Police Section 144) नवी दिल्ली येथे नीट पेपरफुटीप्रकरणी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत खबरदारीसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई शहरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) अंतर्गत कलम १४४ लागू करण्यात आले असून दि. २३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू असतील.
 
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, २३ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजतापासून ते ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू राहणार आहेत. याद्वारे सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली असून मिरवणुकांमध्ये लाऊडस्पीकर, ध्वनिवर्धक, वाद्यवृंद तसेच फटाके फोडण्यासही मनाई करण्यात आली आहे.(Mumbai Police Section 144)
 
मात्र, विवाह समारंभ, अंत्ययात्रा, कंपन्या व सहकारी संस्थांच्या वैधानिक बैठका, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, न्यायालये, दुकाने, कारखाने आणि नियमित व्यावसायिक कामकाज यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.(Mumbai Police Section 144)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर