मुंबई: (Devendra Fadnavis) सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार आणि राजकीय अशांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर टीका करत, अशा प्रकारांना सरकारकडून कडक कारवाईचा इशारा दिला. "जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्यासाठी विनापरवानगी आंदोलन करणे आणि हिंसा करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. अशा प्रकारांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल," असा आक्रमक पवित्रा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करतायत. अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे. पण अराजकता कशी तयार करता येईल? त्याचाही प्रयत्न करतायत. ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं त्यावेळी आपण दिल्लीमध्ये देखील बघितलं की कशाप्रकारे नेतृत्वहीन अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली. (Devendra Fadnavis)
पुढे ते म्हणाले, "कोणत्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीमार करणे आवडत नाही. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असल्यास पोलिसांना आवश्यक ती कारवाई करावी लागते. कालही पोलिसांनी मोठा संयम दाखवला आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तेवढीच कारवाई केली," असे त्यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री यांनी सर्व आंदोलकांवर आरोप करण्यास नकार देत, "काही आंदोलक चांगल्या भावनेने आंदोलन करत असतील. मात्र त्यांच्यात काही असे लोकही घुसले आहेत, ज्यांना मूळ प्रश्नाशी काहीही देणे-घेणे नसून केवळ अराजकता निर्माण करायची आहे. अनेकांना आंदोलनाच्या मूळ विषयाचीही माहिती नाही; ते फक्त स्वतःचा अजेंडा राबवत आहेत," असेही नमूद केले. (Devendra Fadnavis)
"लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. केवळ लोकशाहीमध्ये आंदोलन करतानाही संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत संविधानाने टाकलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल शांतिपूर्ण आंदोलन करत असेल तर अशा आंदोलनाला परवानगी पण दिली जाईल आणि अशी आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे", असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री यांनी पुढे सांगितले की, आंदोलनातील अनेक लोकांना नीट काय हे देखील माहिती नाही परीक्षा कधी झाली हे देखील माहिती नाही. ते आपापला अजेंडा सांगत आहेत. याचा अर्थ असा आहे की, सगळे काही एका दिशेने चालणारे एका विचारासाठी तिथे आलेले नाही. हवशे नवशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि काही राजकीय पक्ष ज्यांना आपल्या राज्यांमध्ये रिजेक्ट केले आहे, असे पक्ष यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का असाही प्रयत्न करतात. (Devendra Fadnavis)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.