आंदोलनाच्या आड राजकारण; राऊतांचा श्रेयवाद

    21-Jul-2026   

NEET Movement
 
मुंबई : (NEET Movement)  नीट पेपरफूटीप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीतर्फे नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या संतापाचे वातावरण आहे. दुसरीकडे, अपेक्षेप्रमाणे या आंदोलनावरून आपली राजकीय पोळी भाजण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरु आहे. संजय राऊतांनी तर, याही पुढे जात थेट आंदोलनाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.
 
नीट परीक्षेतील गोंधळामुळे दिल्लीतील जंतरमंतर येथे सीजेपीकडून आंदोलन सुरु आहे. सोमवारी, या आंदोलनाला हिंसक वळण लागले. संसदेकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांना रोखताना झालेल्या दगडफेक आणि लाठीचार्जमुळे अनेक आंदोलक आणि पोलिस जखमी झाले. महाराष्ट्रातही विविध भागांत या आंदोलनाचे पडसाद उमटले. दरम्यान, विरोधकांनीही या आंदोलनाच्या निमित्ताने वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.
 
मंगळवारी, एका पत्रकाराने "आदित्य ठाकरे आम्हाला भेटत नाहीत, असे तुमच्या पक्षाचे खासदार म्हणतात. ते ग्राऊंडवर येत नाहीत. विरोधकांचे प्रश्न मांडायला अभिजित दीपकेंना अमेरिकेतून इथे यावे लागले," असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला.(NEET Movement)
 
यावर संजय राऊतांचा पारा चढला. ते त्या पत्रकारावर संतापले आणि हळू बोला असे त्याला सांगून हा प्रश्न मुर्खपणाचा आहे असे म्हणाले. शिवाय आदित्य ठाकरे ग्राऊंडवर आहेत. अमेरिका, लंडन किंवा न्यूयॉर्कमधून कुणी आले म्हणून आंदोलन होत नाही. आम्ही सगळे त्या आंदोलनाच्या पाठीशी आहोत म्हणून ते आंदोलन यशस्वी होत आहे, असे राऊत म्हणाले. त्यामुळे आंदोलनाचा विषय, आंदोलनकर्त्यांचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या हे सगळे बाजूला ठेवून संजय राऊतांकडून या आंदोलनाचे श्रेय लाटण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरु असल्याचे दिसते.(NEET Movement) 
 
आदित्य ठाकरेंची दिल्लीवारी कधी?
 
जवळपास गेल्या २५ दिवसांपासून सोनम वांगचूक आणि अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. याकाळात अनेक राजकीय नेते, अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते या आंदोलकांच्या भेटीला गेले. एवढेच नव्हे, मनसे नेते अमित ठाकरेंनीदेखील दिल्लीत आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. मग संजय राऊतांच्या म्हणण्याप्रमाणे आदित्य ठाकरे ग्राऊंडवर असतील तर त्यांना दिल्लीला जाणे का जमले नाही? असा प्रश्न उपस्थित होतो.(Sanjay Raut)
 
...तेव्हा जाग का आली नाही?
 
नीट पेपरफुटी प्रकरणाला जवळपास दोन महिने उलटले आहेत. त्यानंतर पुन्हा परीक्षा होऊन त्याचे निकालही जाहीर झालेत. मग आदित्य ठाकरेंसह विरोधकांना तेव्हाच आवाज उठवण्याची गरज का वाटली नाही? त्यांनी तेव्हाच आंदोलने का केली नाहीत? आता सीजेपीच्या आंदोलनामुळे हा मुद्दा तापल्यानंतर विरोधकांना जाग आली का? शिवाय ठाकरेंना खरंच एवढी तळमळ वाटत होती तर, त्यांनी पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या पालकांची भेट घेतली का? या प्रश्नांची उत्तरेही संजय राऊतांनी द्यायला हवीत.(NEET Movement)
 
"नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे श्रेय घेण्याची स्पर्धा लावण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या वेदना समजून घेण्याची गरज आहे. पण नेहमीप्रमाणे जनाब संजय राऊत यांनी आंदोलनाचा केंद्रबिंदू विद्यार्थी न ठेवता स्वतःचे राजकारण पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करणे थांबवा. आंदोलनाचे श्रेय लाटण्यापेक्षा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे योगदान द्या. महाराष्ट्राची जनता आता श्रेयवाद आणि दिखाऊ राजकारण ओळखून आहे. विद्यार्थ्यांच्या भावनांवर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न जनता कधीच स्वीकारणार नाही."(NEET Movement)
 
- नवनाथ बन, मुख्य प्रवक्ते, भाजप
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर