ठाणे : (Chief Minister Community Health Camp) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने रविवारी 19 जुलै रोजी ठाण्यात भव्य ‘मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिर’ आयोजित करण्यात आले. वीर सावरकर नगर येथील आर. जे. ठाकूर महाविद्यालयाच्या परिसरात पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले..
सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विविध आजारांची मोफत तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य सल्ला, आवश्यक वैद्यकीय चाचण्या तसेच पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या विविध योजनांची माहिती देत गंभीर आजारांवरील उपचारांसाठी उपलब्ध आर्थिक मदत, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे अनेक गरजू रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना या उपक्रमाचा थेट लाभ झाला.(Chief Minister Community Health Camp)
या शिबिरात तब्बल २,२९५ नागरिकांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. शेकडो लाभार्थ्यांना मोफत औषधे आणि चष्म्यांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र Senior Citizen Zone उभारण्यात आल्याने त्यांना नोंदणी, तपासणी आणि विविध वैद्यकीय सेवांचा लाभ सुलभपणे घेता आला. या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.(Chief Minister Community Health Camp)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात अनेक युवक व नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली. आरोग्य शिबिरासोबतच या रक्तदान उपक्रमालाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
राज्य शासनाच्या लोकाभिमुख आरोग्य उपक्रमांना बळ देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात विविध क्षेत्रांतील वैद्यकीय तज्ज्ञ, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. शिबिराचे नियोजन आणि व्यवस्थापन समन्वय प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले.(Chief Minister Community Health Camp)
यावेळी आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादामुळे समाधान व्यक्त केले..
“मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न होता. या शिबिराच्या माध्यमातून २,२९५ नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा, मोफत औषधे, चष्मे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देता आले, याचा विशेष आनंद आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न यापुढेही सातत्याने सुरू राहील.”
-ऍड.निरंजन डावखरे,आमदार (Chief Minister Community Health Camp)