
याचा विचार करून सेट परीक्षा विभागाने २० जुलै रोजी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.यात समन्वयक म्हणतात,"६ सप्टेंबरला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सी टी इ टी) पूर्वनियोजीत असल्याने सेट आणि सी. टी. इ. टी. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी झाल्यास विद्यार्थांना कोणत्यातरी एक परीक्षेस मुकावे लागेल. (SET Exam 2026)
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सेट परीक्षेची तारीख बदलण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांचे ईमेल व पत्र सेट विभागास प्राप्त झाले होते.त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता कोणताही विद्यार्थी सेट परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी आता सेट परीक्षा ६ सप्टेंबर ऐवजी २७ सप्टेंबर,२०२६ ला होणार आहे."असे पत्रक सेट परीक्षा समन्वयक यांनी २० जुलै रोजी प्रसिध्द केले आहे. (SET Exam 2026)