आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर

    20-Jul-2026   
Kanada Raja Pandharicha
 
मुंबई : (Kanada Raja Pandharicha) सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त ‘कानडा राजा पंढरीचा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर होणार आहे. शनिवार, दि. २५ जुलै रोजी सायंकाळी ६.०० वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम सादर होणार आहे.
 
या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या सुमधुर आवाजातून भक्तिगीते, अभंग आणि विठ्ठलभक्तीपर रचनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. संगीत संयोजन निरंजन लेले यांचे असून, कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी करणार आहेत. सचिन सावंत, अथर्व आठल्ये, संतोष दिवेकर, अमित गोठीवरेकर आणि संदीप कुलकर्णी हे वादक कलाकार कार्यक्रमात साथसंगत करणार आहेत. (Kanada Raja Pandharicha)
 
प्रवेश विनामूल्य
 
सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, मुंबई व परिसरातील विठ्ठलभक्त, वारकरी, संगीतप्रेमी, कला रसिक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिरसपूर्ण सांगीतिक अनुभवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे. (Kanada Raja Pandharicha)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर