नवी दिल्ली: (CJP Parliament March) नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहाराविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) पुकारलेल्या संसदेवरील महामोर्चाच्या दिवशी २० जुलै रोजी दिल्लीत अभूतपूर्व तणाव निर्माण झाला आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होत असतानाच जंतर-मंतर येथे जमलेल्या आंदोलकांनी पोलिस आणि आरपीएफ जवानांवर दगडफेक केल्याचे दृष्य समोर आले आहे. दरम्यान, सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी पोलिसांवर आंदोलनाला बदनाम करण्यासाठी "दगडांनी भरलेला ट्रक उभा केल्याचा" गंभीर आरोप केला आहे, तर सफदरजंग रुग्णालयातून सोनम वांगचुक यांनी टिश्यू पेपरवर लिहून ३ अटींवर उपोषण सोडण्याची तयारी दर्शवली आहे. (CJP Parliament March)
परवानगी नाकारलेली असतानाही संसदेवर धडक मारण्यासाठी हजारो आंदोलक जंतर-मंतरवर जमले आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आणि आरपीएफने सौम्य लाठीचार्ज केला. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, मनीष सिसोदिया, आतिशी, ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण आणि अभिनेत्री शबाना आझमी घटनास्थळी पोहोचल्या आहेत. (CJP Parliament March)
आंदोलनावेळी पोलिसांवर झालेल्या दगड फेकीनंतर, आंदोलनाला हिंसक वळण लावण्यासाठी दिल्ली पोलिसांचान हा कट असल्याचा दावा सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावर केला आहे. दीपके म्हणाले, "दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवर आधीच दगडांनी भरलेला एक ट्रक आणि नादुरुस्त व्हॅन आणून ठेवली आहे. गुंडांकरवी आंदोलकांवर दगडफेक घडवून आणायची आणि त्यानंतर आंदोलकांनाच बदनाम करायचे, असा पोलिसांचा कट आहे." (CJP Parliament March)
सोनम वांगचुक यांचे रुग्णालयातून टिश्यू पेपरवर पत्र; ३ अटी जाहीर
शनिवारी पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलेल्या सोनम वांगचुक यांचे वैद्यकीय बुलेटीन जारी करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, सकाळी ६ वाजता वांगचुक यांनी टिश्यू पेपरवर लिहिलेले पत्र सोशल मीडियावरून प्रसिद्ध करण्यात आले. (CJP Parliament March)
वांगचुक यांनी उपोषण सोडण्यासाठी खालील ३ अटी ठेवल्या आहेत:
सरकारने पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अपयशांची अधिकृत जबाबदारी स्वीकारावी.
सीजेपी नेतृत्व आणि मला संसदेच्या दारापर्यंत जाऊ देऊन तेथील सर्वपक्षीय खासदारांनी हा मुद्दा संसदेत मांडण्याचे आश्वासन द्यावे. (CJP Parliament March)
किंवा खासदारांनी रुग्णालयात येऊन आम्हाला हे आश्वासन द्यावे.
दिल्लीत हायअलर्ट; ५ प्रमुख मेट्रो स्टेशन्स बंद
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याने आणि बीएनएसएस (BNSS) कलम १६३ (पूर्वीचे CRPC १४४) लागू असल्याने दिल्ली पोलिसांनी कडक सुरक्षा तैनात केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव DMRC ने जनपथ, राजीव चौक, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरीएट आणि सेवा तीर्थ ही ५ प्रमुख मेट्रो स्टेशन्स पुढील सूचनेपर्यंत जनतेसाठी पूर्णपणे बंद केली आहेत. (CJP Parliament March)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.