मुंबई : (BJP Maharashtra) भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्याविषयी सोशल मीडियावर खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि बदनामीकारक पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दि. १७ जुलै २०२६ रोजी हा गुन्हा दाखल करण्यात असून, भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२), ३५६(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
भाजपचे सोशल मीडिया सहसंयोजक निखिल भामरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नवनाथ बन यांचे नाव, छायाचित्र आणि भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते म्हणून असलेली ओळख वापरून फेसबुक, इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह, दिशाभूल करणाऱ्या आणि बदनामीकारक पोस्ट प्रसारित करण्यात आल्या. या पोस्टद्वारे बन यांची प्रतिमा मलिन करण्याचा, समाजात त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण करण्याचा आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.(BJP Maharashtra)
एफआयआरमध्ये १४ वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, या अकाउंट्सवरून संबंधित पोस्ट प्रसारित झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित अकाउंटधारकांची ओळख पटविणे, डिजिटल पुरावे गोळा करणे आणि पोस्टचा उगम शोधण्याचे काम महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुरू केले आहे. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सायबरकडे असून, नियुक्त तपास अधिकाऱ्यांकडे पुढील तपास सोपविण्यात आला आहे. तपासात आणखी तथ्ये समोर आल्यास संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.(BJP Maharashtra)
गुन्हा दाखल झालेले अकाऊंट
गजाभाऊ, रोखठोक, एक कोटी पवार समर्थक, द व्हॉईस, मी पुणेकर, दिलीप चव्हाण, हेमा पिंपळे या फेसबुक अकाउंटवर तर, shivrajbangarpatil_official, sumeshdive, सिद्धार्थ बोबडे, radioactive_dinesh, गणेश बोऱ्हाडे पाटील, गद्दार रिक्षावाला आणि संदीप उडमाळे या इन्स्ट्राग्राम अकाउंटवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.(BJP Maharashtra)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....