परवानगी असूनही जगन्नाथ रथयात्रेचा रस्ता अडवला

मालवणी पोलिसांच्या भूमिकेविरोधात विहिंप, बजरंग दलाचे तीव्र आंदोलन

    17-Jul-2026   
Jagannath Rath Yatra Malad
 
मुंबई : (Jagannath Rath Yatra Malad) मालाड येथे जय जगन्नाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित 'श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव २०२६' च्या मार्गात ऐनवेळी पोलिसांकडून बदल करण्यात आल्याने मालाडमध्ये गुरुवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या या भूमिकेविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदोलन छेडल्याचे निदर्शनास आले.
 
अशी माहिती आहे की, जय जगन्नाथ चॅरिटेबल ट्रस्टने या रथयात्रेसाठी मुंबई पोलीस अधिनियम कलम ३६ अन्वये रीतसर मिरवणुकीचा परवाना मिळवला होता. मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून ११ जुलै रोजीच या रथयात्रेला रीतसर परवानगी देण्यात आली होती. या रथयात्रेत अंदाजे ४०० ते ५०० महिला, पुरुष आणि लहान मुले सहभागी होणार असल्याची कल्पना देखील पोलिसांना देण्यात आली होती.
 
आयोजकांनी घेतलेल्या परवानगीनुसार, दि. १६ जुलै रोजी, दुपारी २:०० वाजता श्री जगन्नाथ मंदिर (मालवणी गाव) ते मालवणी गेट क्र. १, गेट क्र. ५, गेट क्र. ६ बस स्टॉप, जुलुसवाडी मार्गे मालवणी गावदेवी मंदिर अशी शोभायात्रा निघणार होती. गावदेवी मंदिरात भगवान जगन्नाथ आठ दिवस वास करणार होते. त्यानंतर २४ जुलै रोजी दुपारी २:०० वाजता मालवणी गावदेवी मंदिर ते दौलत शाळा, मार्वे रोड, मालवणी व्हिलेज, जरीमरी माता मंदिर आणि तेथून यू-टर्न घेऊन पाठारेवाडी मार्गे पुन्हा जगन्नाथ मंदिरात येऊन यात्रेचा समारोप होणार होता.(Jagannath Rath Yatra Malad)
 
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आवश्यक परवानग्या असतानाही पोलिसांनी रथयात्रेच्या ठरलेल्या मार्गात ऐनवेळी बदल केला. पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड्स लावून रथयात्रेचा मूळ रस्ता अडवला. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे भाविक आणि आयोजकांमध्ये तीव्र संताप पसरल्याचे दिसून आले. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदआणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. नी पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करत आंदोलन सुरू केले आहे. "हिंदूंचे सण आणि उत्सव आले की प्रशासनाकडून जाणीवपूर्वक अशाप्रकारे अडवणूक केली जाते," असा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.(Jagannath Rath Yatra Malad)
 
मालवणीतल्या प्रत्येक हिंदूच्या पाठीशी खंबीर
 
हिंदूंचे धार्मिक सण आले की अशा पद्धतीने वारंवार अडवणूक केली जाते. मालवणीमध्ये एकही हिंदू शिल्लक राहू नये, असे इथल्या आमदाराची इच्छा आहे. त्यामुळे हिंदूंनी इथून पलायन करावे असे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र विश्व हिंदू परिषद तसे होऊ देणार नाही. आम्ही मालवणीतल्या प्रत्येक हिंदूसोबत खंबीरपणे उभे आहोत. प्रशासनाच्या या भूमिकेवर आमचा आक्षेप आहे.(Jagannath Rath Yatra Malad)
 
- मिथीलेश सिंह, मालवणी प्रखंड मंत्री, विश्व हिंदू परिषद (Jagannath Rath Yatra Malad)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर