डॉक्टर मारहाण प्रकरणातील सहआरोपींच्या जामीनाचा अर्ज राखून; सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकणार

    16-Jul-2026   
 
 
Ramesh Mhatre Doctor Assault Case
 
कल्याण (Ramesh Mhatre Doctor Assault Case) : डॉक्टर मारहाण प्रकरणातील तीन सहआरोपींच्या जामीनाचा अर्ज न्यायालयात दाखल केला असून या संदर्भात सरकारी वकील आणि तपास अधिकारी यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती बचावपक्षाचे वकीलाकडून देण्यात आली आहे.
 
महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या गर्भवती महिलेला उपचारावरून नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मंगळवारी डॉक्टरांना मारहाण केली होती. याप्रकरणी म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यासह तिन्ही सहआरोपींना १३ जुलैपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर २४ जुलै पर्यत त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. याच वेळी बचाव पक्षाकडून म्हात्रे यांच्या जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. १४ जुलै रोजी म्हात्रे यांना वैद्यकीय कारणामुळे जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. त्यामुळे म्हात्रे यांना दिलासा मिळाला असला तरी या प्रकरणातील अन्य तीन आरोपी यांचा जामीन अर्जावर सुनावणी अद्याप बाकी होती. अन्य तीन आरोपीच्या जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. या संदर्भात सरकारी वकील आणि तपास अधिकारी यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल असे सांगण्यात आले आहे असे बचाव पक्षाचे वकील गणेश पाटील यांनी सांगितले. (Ramesh Mhatre Doctor Assault Case)
 
 




संबंधित मजकूर