डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर, अन्य तीन सहआरोपींच्या जामीनावर आज सुनावणी

    15-Jul-2026   
Doctor Assault Case Ramesh Mhatre Bail 
 
डोंबिवली (Doctor Assault Case Ramesh Mhatre Bail) : डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ५० हजाराचा रोख जामीन मंजूर करण्यात आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. म्हात्रे यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. तसेच या प्रकरणातील अन्य सह आरोपी यांच्या जामीनावर बुधवारी दि. १५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती ॲड मुजाहिद काझी यांनी दिली आहे. (Doctor Assault Case Ramesh Mhatre Bail)
 
 
महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या गर्भवती महिलेला उपचारावरून नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मंगळवारी डॉक्टरांना मारहाण केली होती. याप्रकरणी म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यासह सह आरोपींना १३ जुलैपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर २४ जुलै पर्यत त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. याच वेळी बचाव पक्षांकडून जामीनासाठी अर्ज करण्यात आला. त्यावर सरकारी वकील व पोलीसांचे म्हणणे ऐकून निर्णय दिला जाईल असं सांगत मंगळवारसाठी निकाल राखून ठेवला होता. सरकारी वकील आणि बचाव पक्ष यांच्यात जबरदस्त युक्तिवाद झाला. सरकारी वकीलांनी रुग्णालय हे केडीएमसीचे असून नगरसेवक देखील केडीएमसीचे असल्याने तपास कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो असा युक्तिवाद केला. वैद्यकीय कारणांमुळे म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करून दिलासा दिला आहे . म्हात्रे यांचे वय ७३ वर्ष आहे. त्यांना बीपीचा त्रास आहे. त्यांची एक किडनी खराब आहे. या वैद्यकीय कारणास्तव त्यांचा जामीन अर्ज कल्याण न्यायालयाने मंजूर केला असल्याचे कल्याण न्यायालयाचे न्यायाधीश के.एस. कातकडे यांनी निर्णय दिल्याचे बचाव पक्षाच्या वकीलांकडून सांगण्यात आले आहे. तसेच म्हात्रे यांच्यासह त्यांचे अन्य तीन सहआरोपी यांच्या जामिन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. (Doctor Assault Case Ramesh Mhatre Bail)
 
 
 




संबंधित मजकूर