मुंबई : ( Dr. Mohan Chavan Honorary Doctorate) राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच भाजपच्या तांडा वस्ती संपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक डॉ. मोहन चव्हाण यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत भारत व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशन, बेंगळुरू यांच्या वतीने मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) प्रदान करण्यात आली. बेंगळुरू येथे आयोजित दीक्षांत समारंभात त्यांचा सन्मान करण्यात आला.
सामाजिक, शैक्षणिक, रोजगार आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांतील कार्य तसेच बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.( Dr. Mohan Chavan Honorary Doctorate)
डॉ. चव्हाण यांनी महाराष्ट्रातील तांड्यांवर 'तांड्यावरची होळी' हा उपक्रम सुरू केला असून, बंजारा समाजाच्या विविध सामाजिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर देशभर कार्य केले आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विविध विकासात्मक उपक्रम पोहोचविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याची नोंद यावेळी करण्यात आली.
बेंगळुरू येथे झालेल्या या समारंभात डॉ. मोहन चव्हाण यांचा मानद डॉक्टरेट प्रदान करून विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी उपस्थित होते.( Dr. Mohan Chavan Honorary Doctorate)