शिवछत्रपतींच्या वारश्याची साक्ष देणाऱ्या पोस्टकार्डचे आशिष शेलारांकडून अनावरण

    11-Jul-2026   
Maharashtra Postal Department
 
मुंबई : (Maharashtra Postal Department) कोकण इतिहास परिषद (मुंबई शाखा) आणि महाराष्ट्र डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या ५ विशेष पोस्ट कार्डांच्या मालिकेचा अनावरण सोहळा दि. १० जुलै रोजी संपन्न झाला. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, सुवर्ण होन, शिवरायी नाणे, राजमुद्रा आणि रायगडावरील शिलालेख या ५ पोस्ट कार्डांचे अनावरण शेलारांनी केले. (Maharashtra Postal Department)
 
यावेळी सर्वांशी संवाद साधत, अॅड. आशिष शेलारांनी महाराष्ट्राचा हा देदीप्यमान इतिहास आणि शिवरायांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या या पोस्ट कार्डसाठी कोकण इतिहास परिषदेच्या आणि महाराष्ट्र डाक विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
 
या सोहळ्याला कोकण इतिहास परिषद, मुंबई शाखेचे अध्यक्ष प्रशांत ठोसर, सचिव प्रविण मोहिते, दर्शनिका विभाग सायली पिंपळे, मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र परिमंडळ रामचंद्र किसन जायभाये, माजी मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ अमिताभ सिंग, संचालक डाक सेवा, नागपूर क्षेत्र डॉ. सुधीर जाखरे उपस्थित होते. (Maharashtra Postal Department)
 
 
 
 




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर