नागपूर देशातील सर्वात मोठे अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर ठरणार;महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण माहिती

Nagpur Agro Convention Centre
 
मुंबई : (Nagpur Agro Convention Centre) नागपूरमध्ये महाराष्ट्र शासनाच्यावतीने उभारण्यात येत असलेले अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर हे देशातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक कन्व्हेन्शन व प्रदर्शन केंद्र ठरणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शनिवार, दि.११ रोजी प्रस्तावित अ‍ॅग्रो कन्व्हेन्शन सेंटरची मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाहणी केली. या केंद्रामध्ये विविध प्रकारची कृषी प्रदर्शने, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषद, प्रशिक्षण शिबिरे आणि व्यावसायिक प्रदर्शनांचे आयोजन करता येणार असून नागपूरला देशातील प्रमुख कन्व्हेन्शन डेस्टिनेशन म्हणून नवी ओळख मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
मुख्यमंत्री म्हणाले की, या केंद्रामधील मुख्य सभागृह हे देशातील कन्व्हेन्शन सेंटर्समधील सर्वात मोठ्या 'कॉलम-फ्री' हॉलपैकी एक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कृषी प्रदर्शन, शेतकरी परिषद, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच विविध उद्योग क्षेत्रांतील कार्यक्रम येथे सहज आयोजित करता येतील. यामुळे विदर्भासह राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.(Nagpur Agro Convention Centre)
 
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी
 
दरम्यान, राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, यापूर्वीच्या कोणत्याही कर्जमाफी योजनेत आधी लाभ घेतलेल्या आणि पुन्हा थकबाकीदार झालेल्या शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले नव्हते. सुरुवातीला अशा शेतकऱ्यांना केवळ ₹५० हजारांपर्यंतची सवलत देण्याचा विचार होता. मात्र, सत्तारूढ पक्षाच्या आमदारांच्या आग्रहामुळे या अटीत बदल करून त्यांनाही संपूर्ण कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी ठरल्याचा दावा त्यांनी केला.(Nagpur Agro Convention Centre)
 
बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांबाबत सरकारची कठोर भूमिका
 
बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांबाबत सरकारने कठोर भूमिका घेतल्याचेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. राज्यभरातून सुमारे ५ हजार बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यापैकी ३०० नमुने निकृष्ट आढळले आहेत. संबंधित उत्पादक आणि विक्रेत्यांविरोधात परवाने रद्द करण्यापासून ते फौजदारी गुन्हे दाखल करण्यापर्यंत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.(Nagpur Agro Convention Centre)
 
तर पिकांचे नुकसान टाळता येईल
 
राज्यात सध्या पावसात सुमारे १९ टक्के तूट असून विशेषतः विदर्भात पावसाचा खंड पडल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हवामानातील बदल लक्षात घेता यंदा पावसाचे स्पेल आणि त्यातील अंतर अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार उशिरा पेरणी केली असून, आवश्यक ठिकाणी संरक्षक सिंचनाचा वापर केल्यास पिकांचे नुकसान टाळता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Nagpur Agro Convention Centre)
 
एसटीएस कारवाईची माहिती लवकरच सर्वांसमोर
 
एटीएसने फार मोठी कारवाई केली आहे. यासंदर्भात लवकरच महत्वाची माहिती आम्ही आपल्याला देऊ. भरपूर गोष्टी या कारवाईमध्ये मिळालेल्या आहेत,असे त्यांनी स्पष्ट केले.
 
संपूर्ण घटनेची सखोल चौकशी
 
अलीकडेच मोशीमध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या संदर्भातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. संबंधित इमारतीमध्ये काही मजले अनधिकृत असल्याची माहिती मिळाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बचावकार्य आणि बाधित नागरिकांचे पुनर्वसन ही सरकारची पहिली प्राथमिकता होती. ती पूर्ण झाल्यानंतर आता संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.(Nagpur Agro Convention Centre)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर