मुंबई : ( Maharashtra Politics) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत २०३४ पर्यंत तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील," असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व्यक्त केला. महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त केला.
बावनकुळे म्हणाले की, राज्याला विकासाच्या मार्गावर नेणारे, दूरदृष्टी असलेले आणि अष्टपैलू नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने अनेक महत्त्वाचे विकास प्रकल्प आणि लोकहिताचे निर्णय अनुभवले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेचा त्यांच्यावर मोठा विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.(Maharashtra Politics)
ते पुढे म्हणाले की, राज्यातील १४ कोटी जनतेची भावना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून कायम राहावे, अशी आहे. मी जाणीवपूर्वक सांगतो की, २०३४ पर्यंत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहणार आहेत. महायुती सरकारच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असून आगामी काळातही विकासाची ही वाटचाल अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वासही बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.(Maharashtra Politics)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.