अनुकंपाधारकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्रीस्तरावर बैठक घडवून आणणार : मंत्री गिरीश महाजन

    10-Jul-2026   
Compassionate Appointment Maharashtra
 
मुंबई : (Compassionate Appointment Maharashtra) "३१ डिसेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य असल्यामुळे अनुकंपा नियुक्तीस अपात्र ठरलेल्या कुटुंबीयांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक घडवून आणण्यात येईल," असे आश्वासन राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
 
तिसरे अपत्य असल्याच्या निकषामुळे अनुकंपा नियुक्तीपासून वंचित राहिलेल्या वारसांना शासकीय सेवेत संधी मिळावी, या मागणीसाठी ६ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले. पोलीस बॉईज असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने अनुकंपाधारक या आंदोलनात सहभागी झाले होते.(Compassionate Appointment Maharashtra)
 
आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी संबंधित प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देत मुख्यमंत्रीस्तरावर शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.(Compassionate Appointment Maharashtra)
 
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, २८ मार्च २००१ रोजीच्या शासन निर्णयानंतर तिसऱ्या अपत्यासंदर्भातील अट लागू करण्यात आली. मात्र, त्यापूर्वी शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही ही अट लागू केल्यामुळे अनेक अनुकंपाधारक शासकीय नोकरीपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे २००१ पूर्वी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना या अटीतून वगळून अनुकंपा नियुक्तीचा लाभ देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.(Compassionate Appointment Maharashtra)
 
दरम्यान, या आंदोलनाला भेट देत मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्रीस्तरावर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.(Compassionate Appointment Maharashtra)
 
"अनुकंपाधारकांच्या मागण्यांकडे शासन सकारात्मक दृष्टीने पाहील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. २००१ पूर्वी शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांवर तिसऱ्या अपत्याचा निकष लागू होऊ नये, ही आमची प्रमुख मागणी आहे. मुख्यमंत्रीस्तरावरील बैठकीत या विषयावर न्याय्य निर्णय होईल, असा विश्वास आहे. मात्र, मागणीबाबत अपेक्षित निर्णय न झाल्यास पुढील लोकशाही मार्गाने राज्यभर जनजागृती व आंदोलनाचा विचार करण्यात येईल."
 
प्रमोद तानाजी वाघमारे, अध्यक्ष, पोलीस बॉईज असोसिएशन, महाराष्ट्र राज्य
 
 




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर