'क्रांतिवीर राघोजी भांगरे' चरित्रग्रंथाचे प्रकाशन

    21-Jun-2026   
Krantiveer Raghoji Bhangare
 
मुंबई : (Krantiveer Raghoji Bhangare) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने डॉ. तुकाराम रोंगटे लिखित 'क्रांतिवीर राघोजी भांगरे' या चरित्रग्रंथाचे प्रकाशन आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. २३ जून रोजी दुपारी ३ वाजता विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाच्या चर्चासत्र सभागृहामध्ये संपन्न होणार आहे.
 
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस भूषवणार आहेत. या ग्रंथाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शहादा येथील ज्येष्ठ कवी व आदिवासी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मा. वाहरू सोनवणे उपस्थित राहणार आहेत.
 
कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून अहमदनगर कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधाकर शेलार आणि संगमनेर येथील ज्येष्ठ साहित्यिक व संशोधक प्रा. विठ्ठल शेवाळे आपले विचार मांडतील.या सोहळ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य डॉ. हर्ष गायकवाड, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनचे डॉ. सुनील भंडगे, आणि मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.(Krantiveer Raghoji Bhangare)
 
 




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर